Hastay Na Hasylach Pahije Telecast Date Change Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hastay Na Hasylach Pahije: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या प्रक्षेपणाची तारीख बदलली; कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…

Nilesh Sable New Comedy Show: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा शो ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवर २० एप्रिलपासून सुरू होणार होता. पण निर्मात्यांकडून या शोची तारीख बदलण्यात आली आहे.

Chetan Bodke

Hastay Na Hasylach Pahije Telecast Date Change

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या आवडता शो 'चला हवा येऊ द्या'ने (Chala Hawa Yevu Dya Show) काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे निलेश साबळे आणि भाऊ कदम आता एका नव्या कॉमेडी शोच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ असं या शोचे नाव आहे. हा शो ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवर २० एप्रिलपासून सुरू होणार होता. पण नुकतंच निर्मात्यांकडून या शोची तारीख बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी त्या तारखेबद्दल माहितीही दिलेली आहे.

‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोतून निर्मात्यांनी कार्यक्रमाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा कॉमेडी शो आता २० एप्रिलऐवजी २७ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

या कॉमेडी शोच्या लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. या कार्यक्रमात भाऊ कदम, ओंकार भोजने सोबतच स्नेहल शिदम, सुपर्णा श्याम आणि रोहित चव्हाण हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमात मराठमोळे अभिनेते भरत जाधव आणि मराठमोळी अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ballaleshwar Temple Pali : नाद करायचा नाय! पूजेचं साहित्य विकणाऱ्या मराठी व्यावसायिकचा दुकानात आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत थाई भाषेतून संवाद; पर्यटक आवाक

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT