बिग बॉस मराठीचा ( Bigg Boss Marathi) खेळ रंगत जात आहे. गेल्या आठवड्यात पॅडी दादा घराबाहेर पडले. पॅडी दादा घराबाहेर गेल्यामुळे सूरजला मोठा धक्का बसला. तर या आठवड्यात निक्कीला वगळता घरातील सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
सूरज आणि निक्कीमध्ये (Nikki Tamboli) चक्रव्युह टास्क होतो आणि त्यात निक्की बाजी मारते. तसेच अरबाजने दिलेल्या म्युचअल फंडची रक्कम जास्त असल्यामुळे निक्कीला 'तिकीट टू फिनाले' मिळते. या आठवड्याच्या मध्ये एलिमिनेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नक्कीने मिळवलेल्या यशावर अरबाज (Arbaz Patel) पटेलची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सोशल मिडियावर स्टोरी टाकून निक्कीला शुभेच्छा आणि पाठिंबा दिला आहे. अरबाजने निक्कीचा फोटो स्टोरीला लावून त्याखाली खूप खास कॅप्शन लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "अभिनंदन निक्की, आपण ट्रॉफीपासून जास्त दूर नाही आहोत" असे म्हणत त्यांने निक्कीला पाठिंबा दिला आहे.
बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजची जोडी नेहमी चर्चेत राहीली. त्यांनी एकत्र बिग बॉसच्या फिनालेला जाण्याचा प्लान केला होता. मात्र कमी व्होट मिळाल्यामुळे अरबाजला घराबाहेर जावे लागले. अरबाजच्या जाण्यामुळे निक्कीला मोठा धक्का बसला. मात्र बाहेर जाऊनही अरबाज निक्कीला पाठिंबा देत आहे. तसचे तिनेच ट्रॉफी जिंकावी असे त्याला वाटत आहे. निक्की फिनालेपर्यंत गेल्याने अरबाजला खूप आनंद झाला आहे. बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबर रोजा पार पडणार आहे. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.