Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : अर्ध्यावरती डाव मोडला...अरबाजच्या राणीचा Emotional Breakdown, पाहा VIDEO

Nikki Tamboli Emotional Breakdown : बिग बॉसच्या घरातून अरबाज बाहेर गेल्यामुळे निक्कीचा इमोशनल ब्रेकडाउन झालेला पाहायला मिळत आहे. ती खूप रडत आहे. तसेच तिला घरात अरबाजची खूप आठवण येत आहे.

Shreya Maskar

यंदाचा 'बिग बॉस' (Bigg Boss Marathi) सीझन ब्लॉकबस्टर ठरला आहे. प्रेक्षकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा सीझन सर्वत्रच खूप गाजला आहे. सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी सीझन 5' 70 दिवसांत संपणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशात काल अरबाजने बिग बॉस घराचा निरोप घेतला. यामुळे निक्की खूप भावुक झाली आहे. जवळचा मित्र अरबाज अचानक एलिमिनेट झाल्यामुळे निक्कीला अश्रू अनावर झाले आहेत . ती अरबाजच्या आठवणीत वेडी झालेली पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस' च्या नवीन आलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरबाजच्या बिग बॉस घरातील एक्झिटमुळे निक्की (Nikki Tamboli ) मानसिकरित्या खूप खचली आहे. तिला बिग बॉस घरात अरबाजची कमी जाणवत आहे. तिला त्याची खूप आठवण येत आहे. म्हणून ती घरात एकटीच बडबडताना दिसत आहे. नवीन प्रोमोमध्ये पार्श्वभूमीवर 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' हे गाणे लावलेले पाहायला मिळत आहे.

निक्की अरबाजचं लॉकेट जवळ घेऊन खूप रडताना पाहायला मिळत आहे. तर निक्की बेडवर झोपून "अरबाज (Arbaz Patel ) तू मला सोडून यार कुठे गेलास... तर पुढे किचनमध्ये जाऊन ती बोलते की, मी हातात कप तुझ्या नावाचा घेतला आहे पण तूच नाही घरी" असे बोलून ती खूप जास्त भावनिक होते. निक्की बिग बॉसच्या प्रवेशद्वाराकडे डोळे लावून बसलेली पाहायला मिळत आहे. तर प्रोमोच्या शेवटी ऐकू येत की, "आता मला अस वाटतय की ही राणी हलली आहे."

अरबाजच्या घरातून जाण्याने निक्की स्वतःला कधी सावरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या आठवड्यात कॅप्टन कोण असणार हे जाणून घेण्यासाठी देखील प्रेक्षक आतुर आहेत. या आठवड्यात दोन सदस्या घराबाहेर जावे लागले आहे. हाताचा दुखापतीमुळे संग्राम चौगुले घराबाहेर पडला तर काल कमी मते मिळाल्यामुळे अरबाजलाही घर सोडावे लागले. आता निक्की घरात एकटी पडली आहे. ती आपला गेम कसा खेळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT