Bigg Boss Grand Finale SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Grand Finale : 'आज की रात...' जान्हवी-निक्कीच्या दिलखेचक अदा, ग्रँड फिनालेला धुरळा उडणार

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5'चा (Bigg Boss Marathi 5) ग्रँड फिनाले (Bigg Boss Grand Finale ) काही तासांवर येऊन ठेपला आहे. कोण होणार या पर्वाचा विजेता याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला घरातील सदस्यांचा देखील एक अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. घरातील सदस्य तुफान डान्स करताना दिसणार आहेत.

सध्या निक्की (Nikki Tamboli ) आणि जान्हवीचा (Jahnavi Killekar) जबरदस्त डान्स पाहून चाहते घायाळ झाले आहेत. त्यांच्या दिलखेचक अदांनी ग्रँड फिनालेच्या मंचावर चांगलीच रंगत आणली आहे. जान्हवी आणि निक्की या दोघीपण 'बिग बॉस मराठी'च्या घरातील धाकड गर्ल आहेत.

'आज की रात...' या गाण्यावर जान्हवी आणि निक्की भन्नाट डान्स करतात. जान्हवी बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच आपली मते ठामपणे मांडताना दिसली तर निक्कीने बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून राडा करताना पाहायला मिळाली. तसेच निक्की आणि अरबाजच्या जोडीने बिग बॉसचे यंदाचे पर्व खूप गाजवले आहे. तसेच निक्की आणि जान्हवीमध्ये ही अनेक वेळा टोकाचे वाद झालेले पाहायला मिळाले आहे. आता या दोघींपैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'बिग बॉस मराठी' यंदाच सीझन ब्लॉकबस्टर ठरलं आहे. आज (6 ऑक्टोबर ) रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून बिग बॉसचा धमाका पाहायला मिळणार आहे. कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT