Sakshi Sunil Jadhav
कुटुंबीयांमधील मोठ्यांच्या सल्ल्याने आज वागणे जास्त योग्य ठरेल. व्यवसाय नोकरी बाबत अडचणी आल्या तरी सुद्धा त्यातून मार्ग काढू शकाल. पैशाची निगडित व्यवहार होतील.
कला क्षेत्रात आघाडी मिळेल. नव्याने एखादी गोष्टी सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सकारात्मकता वाढेल. आपला प्रभाव राहील.
मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नको असणाऱ्या गोष्टींचा ससेमिरा मागे लागेल. काळजी घ्यावी.
नव्याने स्नेहबंध निर्माण होतील. घरातील जवळच्या नातेवाईकांकडून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमामध्ये मात्र आपले वजन राहील .
सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजकारणामध्ये नव्याने घटना घडतील. मानसन्मान पैसा प्रतिष्ठा यामध्ये भरघोस यश मिळेल. दिवस चांगला आहे प्रवास होतील.
विष्णू उपासनेने मनोरथ पूर्ण होतील. देवस्थळी भेटी होतील. यशासाठी वेगळी काहीतरी चळवळ करावी ज्यामधून योग्यतो मार्ग निघेल.
धावपळ खटपट करून यश मिळवावे लागेल. कोणाच्या सहकार्याची आज अपेक्षा नको. खर्च करताना मात्र मोजून मापून करा.
जोडीदाराबरोबर अबोला संभवतो आहे. एकमेकांना समजून घेऊन आज कामे करावी लागतील. व्यवसायामध्ये मात्र चांगल्या गोष्टीत सहज बाजी मारण्याचा आजचा दिवस आहे.
रोग आजार, हितशत्रू, कर्ज, कटकटी, नोकरी मधील त्रास यांनी दिवस भरलेला आहे. थोडसं मनाची उभारी ठेवल्यासच दिवसभ बरा राहील.
अबोल्यामध्ये प्रेम वाटेल. मोठ्या गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. संततीकडून आशा देणाऱ्या वार्ता येतील. जेणेकरून दिवसाचे सार्थक वाटेल.
घरामध्ये पाहुण्यांचा आगमन होईल. एखादी नव्याने खरेदी घरी होईल. वाहन सौख्य, गृह सौख्य, मातृसौख्य सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस चांगला आहे.
जवळचे प्रवासातून फायदा आहे. शेजाऱ्यांचे योग्य ते सहकार्य आज मितीला मिळेल. प्रेमामध्ये लाभ होतील. दिवस सुखकर आहे.