Padar Song SAAM TV
मनोरंजन बातम्या

Padar Song : 'पदर' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ, निक शिंदे -अनुश्री माने यांचा रोमँटिक अंदाज

Nick Shinde-Anushree Mane : हल्ली मराठी रोमँटिक गाण्यांचा ट्रेंड आहे. अशात आता निक शिंदे आणि अनुश्री माने यांच्या एका खास गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

सध्या प्रेक्षकांमध्ये रोमँटिक गाण्यांचा ट्रेंड असल्याचे पाहायला मिळतेय. एकामागोमाग एक प्रेमाच्या परिभाषेवर आलेली गाणी साऱ्या प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच रोमँटिक गाण्यांच्या यादीत एका मराठमोळ्या गाण्याची भर पडली असून हे गाणं साऱ्यांना थिरकायला भाग पाडतंय. प्रशांत नाकती यांचे 'पदर' हे मराठमोळं गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता निक शिंदे आणि अभिनेत्री अनुश्री माने या जोडीचा रोमँटिक अंदाज या गाण्यातून साऱ्यांच्या मनाचा ठाव घेत आहे.

प्रत्यक्षात पाहिलेल्या एका नखरेल मुलीला थेट स्वप्नांत आपली प्रेयसी करण्यापर्यंतचा प्रियकराचा क्युट असा प्रवास या गाण्यातून पाहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर स्वप्न पडून गेल्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा ती मुलगी समोर येते तेव्हा त्या प्रियकराची होणारी घालमेल या गाण्यात पाहणं रंजक ठरणार आहे. प्रशांत नाकतीच्या या 'पदर' गाण्याच्या निर्मितीची धुरा 'एरीक' आणि 'विण्मयी म्युझिक' यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर या रोमँटिक गाण्यात निक शिंदे आणि अनुश्री माने यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नाकती यांनी पेलवली आहे. तर संगीत दिग्दर्शक म्हणूनही प्रशांत नाकती आणि संकेत गुरवने बाजू सांभाळली आहे.

'पदर' गाण्याला सोनाली सोनावणे आणि केवल वलंज यांनी स्वरबद्ध केलं आहे. एकूणच या रोमँटिक गाण्यात निक व अनुश्रीचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय. अखेर पदर गाण्यातील प्रियकराचं स्वप्न पूर्ण होणार का याची साऱ्यांना उत्सुकता असून हे गाणं 'विण्मयी म्युझिक' या युट्युब चॅनेलवर जाऊन नक्की पाहा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ४ वर्षे मोबाईल वापरला नाही, २२ व्या वर्षी UPSC क्रॅक अन् IAS झाल्या, महाराष्ट्र कन्या स्नेहल यांची यशोगाथा वाचा

Breakfast Recipe : मुलांच्या डब्यासाठी झटपट रेसिपी, चव अन् पोषण दोन्ही मिळेल

Diwali Special weight loss Plan: दिवाळीच्या दिवसात गोडधोड खाणार असाल तर कसं ठेवाल वजन नियंत्रणात

Gajlakshmi Rajyog: १२ वर्षांनी मिथुन राशीमध्ये बनणार गजलक्ष्मी राजयोग; पैशांची बचत शक्य, मिळणार केवळ लाभच लाभ!

Diwali 2024 : दिवाळीत स्लिम अन् ब्युटिफूल दिसायचंय? 'या' आहेत सिंपल जादुई वेटलॉस टिप्स

SCROLL FOR NEXT