Nick Jonas Video  Instagram/ @nickjonas
मनोरंजन बातम्या

Nick Jonas: निक जोनसला 13 व्या वर्षी झाला 'हा' आजार; सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली मोठी माहिती

निक जोनस 13 वर्षांचा असताना त्याला टाइप 1 मधुमेहाचे निदान झाले होते. आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nick Jonas Share Diabetes Symptoms: गायक निक जोनस सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोबतच त्याची पत्नी भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्राही बरीच सोशल मीडियावर सक्रिय असते. निक बऱ्याचदा सोशल मीडियावर प्रियंकासोबतचे फोटो शेअर करत असतो. गेल्या काही दिवसांपुर्वी ते भारतात आल्याने बरेच चर्चेत होते. सध्या भारतात प्रियंका, निक आणि त्यांची लेक मालती भारतात आली आहे.

निक जोनस 13 वर्षांचा असताना त्याला टाइप 1 मधुमेहाचे निदान झाले होते. आज जागतिक मधुमेह दिन आहे. या दिवसाचे निमित्त साधत त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे, या व्हिडीओला निकनं कॅप्शन दिले की, 'टाइप 1 मधुमेहाची चार लक्षणं मला जाणवली होती. जास्त तहान, वजन कमी होणे, वारंवार लघवी होणे आणि चिडचिड होणे ही लक्षणं मला जाणवली होती.'

व्हिडीओ शेअर करुन निकनं World Diabetes Day चा हॅशटॅगचा वापर करत व्हिडिओ शेअर केला आहे. महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती शेअर करण्यासाठी निकने व्हिडिओचा वापर केला. नेटिझन्सने त्याचे कौतुक केले आणि 9 दशलक्षाहून अधिक युजर्सने त्याचा हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याची ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलीच शेअर झाली आहे.

निक नेहमीच त्याच्या चाहत्यांसोबतच मधुमेहासंबंधीत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. त्याने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना टाइप-1 मधुमेह झाल्याचे सांगितले. निक आणि प्रियंका २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले असून त्यांना 'मालती मेरी चोप्रा जोनास' नावाची मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांमधून मोठा आवाज का येतो?

Maharashtra Live News Update: आमदार रवी राणांचा कडूंवर पुन्हा गंभीर आरोप

Dnyanada Ramtirthkar: ठिपक्यांची रांगोळी फेम ज्ञानदाने केलय फोटोशूट, दिसते खुपच सुंदर

Chanakya Niti: घरात पैसा टिकत नाहीये? चाणक्यांनी सांगितलेले ५ नियम आतापासून फॉलो करा

Kitchen Tips : भाजी खूप तिखट झाली? पटकन करा 'हा' उपाय, चव बिघडणार नाही

SCROLL FOR NEXT