Squid Game Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

'स्क्विड गेम'सारखा रिअॅलिटी शो येतोय, तुम्हालाही भाग घेता येणार

नेटफ्लिक्सने स्क्विड गेम ही सीरीज प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सने घोषणा केली आहे की, ते 'स्क्विड गेमः द चॅलेंज' नावाचा रिअॅलिटी शो देखील आणणार आहेत, ज्यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नेटफ्लिक्सची सुपरहिट सीरीज 'स्क्विड गेम'ला जगभरातून प्रचंड प्रेम मिळाले आहे. या कोरियन मालिकेत लहानपणीच्या खेळातून मोठे बक्षीस जिंकण्याच्या संधीसाठी स्पर्धक यामध्ये सहभागी होतात. पण यात पराभूत झालेल्याला फक्त मृत्यू हाच पर्याय असतो. यामध्ये सहभागी होणारे लोक डावपेच आणि फसवणूक करून खेळात जिंकण्याचा प्रयत्न करतात. पण आता नेटफ्लिक्सने ही सीरीज प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सने (Netflix) घोषणा केली आहे की, ते 'स्क्विड गेमः द चॅलेंज' (Squid Game:The Challenge) नावाचा रिअॅलिटी शो देखील आणणार आहेत, ज्यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं.

माहितीनुसार, या रिअॅलिटी शोमध्ये देखील ४५६ सदस्य सहभागी असतील आणि सीरीजमध्ये जसं पराभूत होणाऱ्यांचा मृत्यू होतो, त्याप्रमाणे या शोमध्ये पराभूत होणाऱ्याला कठोर शिक्षा दिली जाईल. हा १० भागांचा रिअॅलिटी शो असेल. यामध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाला ४.५६ मिलियन डॉलर म्हणजेच ३५.५६ कोटी रुपयांची मोठी रक्कम दिली जाईल. ही रक्कम रिअॅलिटी शोच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे.

नेटफ्लिक्सने या रिअॅलिटी शोच्या घोषणेमध्ये सांगितलं की, या शोमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाला सीरीजमध्ये दाखवले गेलेले खेळ खेळावे लागतील. त्याचबरोबर या शोमध्ये अन्य खेळांचाही समावेश असेल. निर्मात्यांनी सांगितले की, या शोमध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे.

या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी अटी आणि नियम

निर्मात्यांनी सांगितले की, 'स्क्विड गेमः द चॅलेंज' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी इंग्रजी बोलता येणे गरजेचे आहे. तसेच २०२३च्या पहिल्या चार आठवड्यांमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. या शोमध्ये देखील ४५६ स्पर्धक असतील. नेटफ्लिक्सने यासाठी कास्टिंग करणे देखील सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

"तू xxx@# आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" शेतावरून वाद, तरूणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

New Bride Tips: नव्या नवरीने घरसंसार सांभाळताना टाइम मॅनेजमेंट कसं करावं?

Famous Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; कंपनीला घातला ५ कोटींचा गंडा, ७ वर्षांपासून होता गायब

Jowar Flour Recipe : ज्वारीच्या पिठाचा हा पदार्थ कधी खाल्लाय का?

SCROLL FOR NEXT