Bibek Pangeni passes away Saam TV
मनोरंजन बातम्या

Bibek Pangeni : नेपाळी इन्फ्लुएंसर बिबेक पांगेनीची कर्करोगाशी झुंज संपली, वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bibek Pangeni : जॉर्जिया विद्यापीठात पीएचडीचा विद्यार्थी असलेला नेपाळी इन्फ्लुएंसर बिबेक पांगेनी याचे मेंदूच्या कर्करोगाशी धाडसी झुंज दिल्यानंतर ३२ व्या वर्षी निधन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bibek Pangeni : जॉर्जिया विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात पीएचडी करणारे आणि सोशल मीडियावरील एक लोकप्रिय इन्फ्लुएंसर म्हणून ओळख असलेला बिबेक पंगेनी याचे ब्रेन ट्यूमरशी दीर्घ आणि शूर लढाईनंतर निधन झाले. सोशल मीडियावरून त्याच्या निधनाची बातमी कळवल्याने जगभरातील त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

२०२२ मध्ये जेव्हा बिबेक पंगेनीच्या ब्रेन ट्यूमरचे निदान झाले तेव्हा त्याने त्याच्या आजारपणाविषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे इंस्टाग्रामवर देण्यास सुरूवात केली. या दरम्यान त्याने त्याचे अनेक अनुभव शेअर केले. त्यांच्या संपूर्ण लढाईत, बिबेक याची पत्नी, श्रीजना सुबेदी हिने त्याला खंबीर आधार दिला ती सतत त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहिली. या कपलने शेअर केलेले व्हिडिओमध्ये त्याच्या संपूर्ण प्रवासाचा उलघडा होतो.

गेल्या काही आठवड्यात बिबेकच्या आरोग्याविषयीच्या अपडेट्स येण्याचे प्रमाण कमी झाले होते. निधनापूर्वीच्या काही दिवसांत त्याची प्रकृती आणखी बिकट झाली. सतत उपचार घेत असताना आणि खूप ताकद दाखवूनही, त्यांची प्रकृती झपाट्याने खालावल्यामुळे नेपाळी इन्फ्लुएंसर बिबेक पांगेनीचे निधन झाले.

बिबेक पांगेनीला ग्लिओमा हा ट्युमर झाला होता. ग्लिओमा हा मेंदू किंवा पाठीच्या कण्यामध्ये विकसित होणाऱ्या ट्यूमरचा एक प्रकार आहे, विशेषतः मज्जातंतू पेशींना आधार देणाऱ्या ग्लिअल पेशींमध्ये हा ट्युमर होतो त्यामुळे मेंदू किंवा पाठीच्या कण्यामध्ये हा ट्युमर वाढत जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्य निरीक्षण अधिकारी 1.75 लाखांची लाच घेताना ACB च्या सापळ्यात अडकला

Honey Trap: नाशिकनंतर साताऱ्यातही हनी ट्रॅप? 2 माजी मंत्री, मंत्र्याचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये?

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT