Oscar 2025 : भारतीय लघुपट ऑस्करच्या शर्यतीत कायम, काय आहे 'अनुजा'चे खास वैशिष्ट्ये ?

Oscar 2025 : ऑस्करच्या शर्यतीत टिकून असलेल्या 'अनुजा' या लघुपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा लघुपट नक्की कोणत्या विषयावर आधारित आहे आणि या लघुपटात कोणते कलाकार आहेत या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Anuja Short Film
Anuja Short FilmPR
Published On

Oscar 2025 : ऑस्कर २०२५ ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ऑस्कर २०२५ सोहळा पुढील वर्षी थाटामाटात संपन्न होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत इथल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या ‘अनुजा’ या इंडो-अमेरिकन लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. ‘लाइव्ह-अ‍ॅक्शन’ शॉर्ट फिल्ममध्ये 'अनुजा' ही १८० शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. ‘अनुजा’ची निर्मिती सुचित्रा मटाई यांची असून गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे.

एडम.जे.ग्रेव्स लिखित आणि दिग्दर्शित या लघुपटामध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट सारख्या कलाकारांनी अभिनय केला आहे. ‘अनुजा’ची कथा एका भारतीय मुलीवर आधारित असून इंडो-अमेरिकन प्रोडक्शन अंतर्गत त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ऑस्करच्या लघुपट श्रेणीत 'अनुजा' लघुपटाला स्थान मिळाल्याबद्दल अभिनेते नागेश भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Anuja Short Film
Abhishek-Aishwarya : या स्पेशल फंक्शनमध्ये अमिताभ बच्चनसोबत पोहोचले अभिषेक-ऐश्वर्या; घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम !

याबद्दल बोलताना नागेश भोसले सांगतात की, ‘ऑस्कर सारख्या मानाच्या सोहळ्यात आपला लघुपट असणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बालमजुरी सारखा सामाजिक प्रश्न या लघुपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडला असून एका उत्तम टीमचा भाग होता आल्याचा आनंद निश्चित आहे’.

Anuja Short Film
Diljit Dosanjh : दिलजीतच्या मुंबईतील कन्सर्टपूर्वी लादण्यात आलेल्या नियमांवर दिली प्रतिक्रिया; 'मी तुमच्या नियमांपेक्षा...'

आमिर खान निर्मित 'लापता लेडीज' हा चित्रपट ९७ व्या ऑस्कर पुरस्कारच्या शर्यतीतून बाहेर पडला असल्याची अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने बुधवारी घोषणा केल्यानंतर आता 'अनुजा' या लघुपटाकडे भारताचे लक्ष लागले आहे.  

९७ व्या ऑस्कर पुरस्कार २०२५ च्या पुरस्कारासाठीची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये विजेते घोषित केले जातील. त्यात 'वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करणारा ‘अनुजा’ लघुपट बाजी मारतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com