Neha Kakkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neha Kakkar: मेलबर्न कॉन्सर्टमध्ये नेहा कक्कर खोट बोलली? रॅपर आणि आयोजकांनी केला धक्कादायक खुलासा, म्हणाले- शोमध्ये गर्दी नव्हती...

Neha Kakkar lie about Melbourne Concert: गेल्या महिन्यात गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, नेहा कक्कर स्टेजवर रडताना दिसली कारण ती कॉन्सर्टला तीन तास उशिरा पोहोचली होती.

Shruti Vilas Kadam

Neha Kakkar lie about Melbourne Concert: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या मेलबर्नमधील कॉन्सर्टनंतर एक मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात ती तीन तास उशिरा पोहोचली, यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली. नेहा स्टेजवर आल्यावर इमोशनल होऊन रडू लागली आणि प्रेक्षकांची माफी मागितली. त्यानंतर सोशल मीडियावर तिने आयोजकांवर गंभीर आरोप केले आणि वादाला सुरुवात झाली. आता त्या कार्यक्रमाबद्दल, रॅपर पेस डी आणि बिक्रम सिंग रंधावा म्हणाले की नेहा कक्कर खोट बोलली होती. तो म्हणतो की नेहा कक्करने कॉन्सर्टपूर्वी खूप राग दाखवला होता आणि गाणे गाण्यास नकार दिला होता.

नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले की, "मी मेलबर्नच्या प्रेक्षकांसाठी पूर्णपणे मोफत परफॉर्मन्स केला. आयोजक माझे आणि इतरांचे पैसे घेऊन पळाले. माझ्या बँडला जेवण, हॉटेल किंवा पाणीही दिले गेले नाही." तिच्या पतीने आणि त्याच्या टीमने जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली. तिच्या म्हणण्यानुसार, साउंड चेकही उशिरा झाला कारण साउंड व्हेंडरला पैसे दिले गेले नव्हते. ​

दुसरीकडे,सिद्धार्थ कन्नन यांच्याशी झालेल्या एका खास मुलाखतीत, रॅपर्स पेस डी आणि बिक्रम सिंग रंधावा म्हणाले, "नेहाचे त्या कंपनीसोबत दोन शो होते. तिचा पहिला शो सिडनीमध्ये होता, जिथे १५००-२००० लोक आले होते आणि तो शो खूप चांगला झाला. दुसरा शो दुसऱ्या दिवशी मेलबर्नमध्ये होता, जिथे ७०० लोक आले होते आणि तोच शो होता जिथे ती तीन तास उशिरा आली होती. प्रेक्षक तिच्यावर खूप रागावले होते. कारण तिची अपेक्षा होती होती सिडनी प्रमाणे मेलबर्नमध्येही स्टेडियम पूर्ण भरलं पाहिजे. अशी अट देखील तिने ठेवली होती.

नेहाने गाणे गाण्यास नकार दिला होता

त्यांनी सांगितले की नेहा कक्करने ७०० लोकांसमोर गाण्यास नकार दिला होता. तिने सांगितले की स्टेडियम भरेपर्यंत ती स्टेजवर जाणार नाही. नेहाने दावा केला होता की आयोजक तिचे पैसे घेऊन पळून गेले होते, स्टेजवर साऊंड चेक झाला नाही कारण आयोजकांनी साऊंड चेक करणाऱ्यांना पैसेही दिले नव्हते. साऊंड चेकबद्दल, रॅपर्स पेस डी आणि बिक्रम सिंग रंधावा म्हणाले की नेहाच्या शोपूर्वी एक सुरुवातीचा कार्यक्रम सादर झाला होता. तिथे साऊंड नीट होता.

नेहाचा दावा खोटा असल्याचे म्हटले गेले

ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियामध्ये हे सामान्य आहे की जर एखादा कलाकार तुमच्या देशात येत असेल तर त्याचे संपूर्ण पैसे कलाकाराला ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी ऍडव्हान्स दिले जातात. दोघांनीही सांगितले की, मेलबर्नमधील नेहा कक्करच्या संगीत कार्यक्रमात गर्दी नव्हती, त्यामुळे आयोजकांना ५,००,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT