Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Pre-Wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनची थीम काय?, नीता अंबानीने केला खुलासा

Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या कपलच्या लग्नाकडे लागले आहे. या कपलच्या प्री-वेडिंग सिरेमनीला सुरूवात होण्यापूर्वी बुधवारी या कपलने अन्नसेवा दिली.

Priya More

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding:

देशातील प्रसिद्ध आणि मोठे उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अर्थात उद्योगपती अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या कपलच्या लग्नाकडे लागले आहे. या कपलच्या प्री-वेडिंग सिरेमनीला सुरूवात होण्यापूर्वी बुधवारी या कपलने अन्नसेवा दिली.

गुजरातमधील जामनगरमध्ये आजपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू होत आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जात आहे. ज्यामध्ये देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. हे सर्व सेलिब्रिटी जामनगरमध्ये दाखल देखील झाले आहेत. उत्सव सुरू होण्यापूर्वी नीता अंबानी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी या कार्यक्रमाची मुख्य थीम उघड केली आहे. प्री-वेडिंग फंक्शनसाठी त्यांनी जामनगरची निवड का केली? या मागचे कारण देखील त्यांनी सांगितले आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग सिरेमनीची जोरदार चर्चा सुरू आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची थीम समोर आली आहे. नीता अंबानी यांनी स्वत: एक व्हिडिओ जारी केला आहे की, या प्री-वेडिंग सिरेमनीची मुख्य थीम 'कला आणि संस्कृती' आहे. नीता अंबानी यांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीपासूनच कला आणि संस्कृतीची ओढ आहे. आता अनंत राधिकासोबत त्याच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू करत असल्याने त्याने तीन दिवसांच्या कार्यक्रमाची थीम म्हणून 'कला आणि संस्कृती' निवडली आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. विवाह सोहळ्यापूर्वी मुकेश अंबानी, त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि होणारी सून राधिका मर्चंट यांनी रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात अन्नसेवा केली. संपूर्ण अंबानी कुटुंबाने स्वतःच्या हाताने लोकांना जेवण वाढले. मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटने यावेळी नागरिकांशी गप्पा देखील मारल्या. ऐवढच नाही तर राधिकाची आजी आणि आई-वडिलांनी देखील जेवण वाढले. या अन्नसेवामध्ये मोठ्यांसख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. जवळपास ५१ हजार स्थानिक नागरिकांनी पारंपारिक गुजराती जेवणाचा आनंद घेतला. ही अन्नसेवा पुढच्या काही दिवस चालणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT