Nita Ambani At NMACC Saam TV
मनोरंजन बातम्या

Nita Ambani Dance: नीता अंबानी यांचे एनएमएसीसी उद्घाटनच्या वेळी खास सादरीकरण; व्हिडिओ व्हायरल

Nita Ambani At NMACC Launch: वयाच्या ५९व्या वर्षी देखील नीता अंबानी ग्रेसफुल दिसत होत्या.

Pooja Dange

Nita Ambani Perform On Raghupati Raghav: नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबासह मुंबईत नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र सुरू केले. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ आणि फोटो ऑनलाइन व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडिओतून येथे सुरू असलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमाची झलक पाहायला मिळत आहे.

एका व्हिडिओमध्ये नीता अंबानी 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन' मध्ये विशेष परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. त्यांनी या सोहळ्याच्या वेळी रघुपती राघव राजा राम यावर नृत्य केले. अनेक पापाराझी आणि NMACC इंडियाच्या अधिकृत अकाउंटवर याची क्लिप शेअर करण्यात आली आहे.

नीता अंबानी त्यांचे नृत्य खूप सुंदर होते. वयाच्या ५९व्या वर्षी देखील त्या ग्रेसफुल दिसत होत्या. त्यांच्या नृत्याच्यावेळी करण्यात आलेले प्रकाश संयोजन कार्यक्रमाची भव्यता दिसून येत होती.

शुक्रवारी मुंबईत एनएमएसीसीचे उद्घाटन झाले. शाहरुख खान, निक जोनाससह प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, वरुण धवन, क्रिती सेनन, करीना कपूर, आमिर खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, विद्या बालन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते.

नीता अंबानी, मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य, ईशा अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी या भव्य स्नेहसंमेलनात पारंपारिक कपडे घातले होते. नीता अंबानी यांनी या कार्यक्रमासाठी जेड ब्लू ब्रोकेड सिल्क साडी नेसली होती. त्यांनी त्यांच्या नृत्य सादरीकरणाच्या वेळी गुलाबी आणि लाल लेहेंगा निवडला होता.

नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या लेहेंगाला रुंद पानाची किनारी, सोन्याचे जाल आणि सिक्वीन्स अलंकार, मणी आणि आरशाचे काम तसेच बारीक ब्रोकेड भरतकाम होते. त्यांनी गुजराथी पद्धतीत लेहंग्याचा पदर काढला होता. त्यांनी हाफ-स्लीव्ह टॉप-स्टाईल ब्लाउजसह पारंपारिक लूक केला होता. गोल नेकलाइन, हेवी गोल्ड नक्षीकाम आणि भरतकाम केलेल्या किनारी त्याच्या ब्लाउजला होत्या.

नीता अंबानी यांनी सहा पदरी माळांचा सोन्याचा आणि पाचूचा हार, बांगड्या, सोन्याचे झुमके, साजेसा असा मग टीका आणि स्टेटमेंट रिंगचा वापर करून साज केला होता. त्यांनी लाल गजरा आणि सोनेरी ऍक्सेसरी वापरून केसांचा बन बांधला होता, डार्क भुवया, लाल बिंदी, गुलाबी लिपस्टिक आणि मस्करा असा त्यांचा संपूर्ण लूक होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

GK: ताजमहलावरील सोन्याचा कळस अखेर कुठे गेला? इतिहासात दडलेलं रहस्य जाणून घ्या

NAM vs SA: OMG! इंटरनेशनॅल क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर; शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं

Dharashiv : शेती वाहुन गेली, पिक मातीमोल झाल; जिवापाड जपलेली जनावर विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

भाजपकडून शिंदे अन् अजित पवार गटाला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बड्या नेत्यांची एन्ट्री

SCROLL FOR NEXT