NEET Paper Leak saam tv
मनोरंजन बातम्या

NEET Paper Leak : "...म्हणून अशिक्षितांना सत्तेत बसवू नका"; नीट पेपर फुटी प्रकरणावर प्रसिद्ध गायक भडकला, केली मोठी मागणी| VIDEO

Vishal Dadlani On NEET Exam Paper Leak : प्रसिद्ध गायकाने नीट पेपर लीक प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर गायकाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. गायक नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नीट पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली

नीट पेपर लीक प्रकरणावर प्रसिद्ध गायकाने संताप व्यक्त केला.

गायकाने व्हिडीओ शेअर करून शिक्षण व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

साम टिव्ही प्रतिनिधी - संजय गडदे

नीट पेपर लीकनंतर देशभरातील विद्यार्थी आणि पालक चिंचेत पाहायला मिळत आहे. नीट पेपर फुटीनंतर परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्व क्षेत्रातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. अशात मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक विशाल दादलानीने (Vishal Dadlani) सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने या प्रकरणात सरकारला चांगलेच सुनावले आहे.

देशभरात NEET-UG पेपर लीक प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असताना आता प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट जोरदार चर्चेत आहे. त्याच्या भूमिकेला अनेक विद्यार्थ्यांनी समर्थन दिले आहे. विशाल ददलानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिक्षण व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

विशाल ददलानी म्हणाला की, "अशिक्षित आणि अज्ञानी लोकांना सत्तेत बसवू नका..." असे म्हणत त्यांनी मतदारांना मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन केले. तसेच पेपर लीकसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. गायकाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. अनेक विद्यार्थ्यांनी विशाल ददलानीच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य सततच्या पेपर लीकमुळे धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली. काहींनी परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याची मागणी केली, तर अनेकांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

NEET पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात आधीच संतापाचे वातावरण असून विरोधकांकडूनही सरकारवर टीका करण्यात येत आहे. अशातच विशाल ददलानी यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशाल ददलानी प्रसिद्ध गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत. गायकाने आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांची 'विशाल-शेखर' ही जोडी बॉलिवूडमध्ये खूपच प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

310 कोटींचा तोटा… एसटी तिकीट महागणार? महायुती सरकारने दिले संकेत|VIDEO

'त्याने सर्व निकष पूर्ण केलेत...'; १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात स्थान द्या, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Kidney Damage Symptoms: सकाळी उठल्यावर हे ५ बदल जाणवतायेत?किडनी खराब होण्याची ही आहेत गंभीर लक्षणं, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT