NCB 'मन्नत' वर पोहोचली; अभिनेत्री अनन्या पांडेच्याही घराची तपासणी Saam Tv
मनोरंजन बातम्या

NCB 'मन्नत' वर पोहोचली; अभिनेत्री अनन्या पांडेच्याही घराची तपासणी

अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील 'मन्नत' बंगल्यावर NCB ची टीम पोहोचली आहे. एनसीबीची एक टीम शाहरुखच्या बंगल्यावर पोहोचली आहे तर दुसऱ्या टीमने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापा टाकला आहे

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील 'मन्नत' बंगल्यावर NCB ची टीम पोहोचली आहे. एनसीबीची एक टीम शाहरुखच्या बंगल्यावर पोहोचली आहे तर दुसऱ्या टीमने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापा टाकला आहे (NCB Raid On Ananya Pande's Residence). शाहरुखने आजच (ता.२१) आर्थर रोड कारागृहात Arthar Road Jail Mumbai आर्यनची भेट घेतली. अंमली पदार्थच्या पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यनचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी (ता.२०) फेटाळला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

यानंतर आता, मुंबई ड्रग्ज प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. एनसीबीची टीम आज गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी देखील पोहोचली आहे. एनसीबीने अनन्या पांडेलाही बोलावले आहे. एजन्सीने अभिनेत्रीला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. अनन्या पांडे Ananya Pandey प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. केवळ अनन्याचे घरच नाही तर एनसीबी टीम शाहरुख खानच्या घर मन्नतमध्येही Mannat सर्च ऑपरेशन NCB Search Operation करत आहे.

अनन्याचे आर्यनसोबत ड्रग्ज चॅट?

अंमली पदार्थच्या पार्टी प्रकरणात अनन्या पांडेचे नाव पुढे येणे हा मोठा धक्का आहे. वृत्तानुसार, आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाबद्दल अनन्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप ड्रग चॅटमध्ये अनन्या पांडेचे नाव समोर आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी असेही वृत्त होते की आर्यन खानने एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीसोबत ड्रग चॅट केले होते. आता एनसीबीने अनन्या पांडेला बोलावले आहे. या कारवाईचे मात्र कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT