Nazim Hassan Rizvi Passed Away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nazim Hassan Rizvi: निर्माते नझिम हसन रिझवी यांचे निधन, वयाच्या ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते नाझिम हसन रिझवी यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Nazim Hassan Rizvi Passed Away: बॉलिवूडमधून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते नाझिम हसन रिझवी यांचे निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

नाझिम हसन रिझवी यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. 2001 मध्ये आलेल्या सलमान खानच्या 'चोरी चोरी चुपके चुपके' या चित्रपटाचेही नाव त्यात आवर्जुन घेतले जाते. या चित्रपटात सलमानसोबत राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा दिसल्या होत्या. नाझिमचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारच पसंदीस पडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नाझिम यांना काही आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, सोमवारी रात्री वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांना कोणता आजार होता, कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची माहिती अद्याप माहिती मिळालेली नाही. नाजिम हे उत्तर प्रदेशचे मुळ रहिवासी असल्याने तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नाझिम निर्मित 'चोरी चोरी चुपके चुपके' हा चित्रपट हिट ठरला होता आणि आजही लोकांना हा चित्रपट पाहायला आवडतो. याशिवाय त्याने 2007 मध्ये आलेला 'अंडरट्रायल', 2012 मध्ये रिलीज झालेला 'कसम से कसम' आणि 2017 मध्ये आलेला 'लादेन आले रे ले' यासह इतर अनेक चित्रपट केले होते. 'कसम से कसम' या चित्रपटातून त्यांनी आपल्या मुलाला लॉन्च केले. अझीम रिझवी असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. मात्र, त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून सिनेजगतासाठी ही अत्यंत दु:खद बातमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

SCROLL FOR NEXT