Nawaz ex-wife Aaliya Drops New Pic With Mystery Man Instagram
मनोरंजन बातम्या

Aaliya Siddiqui On Her Relationship: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा नवा लाईफ पार्टनर कोण?, स्वत: आलियाने केला खुलासा...

Alia Siddiqui About Her Mystery Man: गेल्या काही दिवसांपुर्वी नवाजुद्दिनची पत्नी आलियाने सोशल मीडियावर एका मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला होता. त्याची ओळख अखेर तिने सोशल मीडियावर सांगितली आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Wife Aaliya Shares Photo With Mystery Man: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया सिद्दीकी गेल्या काही महिन्यांपासून कमालीचे चर्चेत आहे. अनेक वाद झाल्यानंतर नवाजुद्दिनने त्याच्याकडून मानहानीचा खटला मागे घेणार असल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपुर्वी नवाजुद्दिनची पत्नी आलियाने सोशल मीडियावर एका मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती मिस्ट्री मॅनसोबत दिसत होती. या व्हिडिओनंतर सतत नेटकऱ्यांनी तिला ‘ही व्यक्ती कोण आहे?’ असा प्रश्न विचारला होता. आता आठवडाभरानंतर आलिया सिद्दीकीने प्रतिक्रिया दिली आहे. त्याची ओळख अखेर तिने सोशल मीडियावर सांगितली आहे.

आलिया सिद्दीकीने एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, तो दुबईत राहतो आणि आयटी क्षेत्रात कामाला आहे. त्या व्यक्तीसोबतच्या नात्याबाबतही त्यांनी खुलासा केला. तिने सांगितले की, नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ब्रेकअप होण्याचे कारण मी नाही.

आलिया सिद्दीकी मुलाखतीत म्हणते, दोघेही एका वर्षापूर्वी एका कॉमन फ्रेंडमुळे भेटले होतो, त्याच्यापासूनच आमची ओळख झाली होती. जेव्हा माझा वाईट काळ सुरू होता, त्यावेळी तो माझा भावनिक आधारस्तंभ बनला होता. आम्ही दोघेही एकमेकांना आपली मातृभाषा शिकवत आहोत. तो मला फ्रेंच आणि इटालियन भाषा शिकवतोय तर मी त्याला हिंदी भाषा शिकवत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आलिया सिद्दीकीने प्रतिक्रिया दिली की, “जर मी आनंदित आहे तर लोकं माझ्या चारित्र्यावर प्रश्न कसे विचारू शकतात. मी दोन वर्षांपूर्वी घटस्फोटाची केस न्यायालयात दाखल केली होती. माझा चांगला मित्र मला एक वर्षांपूर्वी भेटला होता. अशा परिस्थितीत तो त्यांचे लग्न मोडण्याचे कारण कसे बनू शकतो. आमचा घटस्फोटाचा खटला अजूनही सुरू आहे. गेली १९ वर्षे मी संघर्ष करत आहे. मी मानसिकदृष्ट्या थकलेय. आता मी मला बदलणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकीचे प्रकरण न्यायाप्रविष्ठ आहे. दोघांनीही एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले आहे. आलियाने अभिनेत्यावर बलात्काराचा आरोपही केला होता, त्यानंतर नवाजुद्दीनने तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकीचे प्रकरण न्यायालयात असल्याची माहिती आहे. दोघांनी एकमेकांवर चिखलफेक केली. आलियाने अभिनेत्यावर बलात्काराचा आरोपही केला होता, त्यानंतर नवाजुद्दीनने तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT