Nawazuddin On Kangana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Praise Kangana: कंगना रनौतमध्ये बोलण्याची हिंमत आहे; नवाजुद्दीन सिद्दीकीनं केलं तोंडभरून कौतुक

Nawazuddin Siddiqui News: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपट उद्योग संबंधित काही मुद्द्यांवरून कंगनाचे कौतुक केले आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui On Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी सध्या आगमी चित्रपट ‘टिकू वेड्स शेरू’ मुळे बराच चर्चेत आला आहे. अभिनेत्याने आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन दिल्यामुळे अभिनेत्याला तुफान ट्रोल केलं जात आहे.

चित्रपट नुकताच ‘Amazon Prime Video’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपट उद्योग संबंधित काही मुद्द्यांवरून कंगनाचे कौतुक केले आहे. इंडस्ट्रीतील प्रश्नांवर बोलण्याची हिंमत किती लोकांमध्ये आहे, असा सवाल नवाजुद्दिनने केला आहे. कंगना रणौत अनेकदा इंडस्ट्रीतील नेपोटिझमवर आणि ‘चित्रपट माफिया’ विरोधात बोलली.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीने एका मुलाखतीत कंगना रणौतबद्दल भाष्य केले आहे. मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो, “फिल्म इंडस्ट्रीतील संबंधित मुद्द्यांवर बोलताना कंगना खूप पारदर्शक आणि सत्य बोलते. अनेक लोक अशा गोष्टी बोलतात जे राजकीय दृष्ट्या योग्य असतात पण तिच्याकडे खूप धैर्य आहे.”

मुलाखतीत पुढे अभिनेता म्हणतो, स्पष्ट बोलणारे इंडस्ट्रीत फार कमी लोक आहेत. जे बॉलिवूडमधील चुका, कमतरता या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे आपले काम करत राहतात. पण बऱ्याच काळापासून न बोललेल्या विषयावर कंगना बोलते आणि ते विषय उत्तमरित्या मांडते.”

नवाजुद्दीन सिद्दीकी पुढे म्हणतो, कंगना अशी एकमेव व्यक्ती आहे, ती कोणत्याही विषयावर आपलं रोखठोक मत मांडते. नेहमीच कंगनाचे विषय मुद्देसुद असतो. सत्य हे कटू असते आणि ते सत्य असते, असे अनेकांचे मत आहे.

यावेळी नवाजुद्दिनने एक प्रश्न उपस्थित केला, “किती लोकांमध्ये इंडस्ट्रीतील प्रश्नांवर बोलण्याची हिंमत आहे? कंगना शानदार आहे.”

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर प्रमुख भूमिकेत असलेला ‘Tiku Weds Sheru’ हा चित्रपट ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या २३ जूनला हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडची बेधडक क्वीन कंगना रनौत हिने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT