Navra Maza Navsacha 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Navra Maza Navsacha 2 Box Office Collection: 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे आणि चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादु पाहायला मिळतेय.

Manasvi Choudhary

नवरा माझा नवसाचा १९-२० वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची जो प्रतिसाद मिळाला तोच 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाला मिळाला आहे. २० सप्टेंबरला चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आता या चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे आणि चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादु पाहायला मिळतेय.

निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासूनच चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिलाय. यामुळेच रिलीज झाल्यानंतर चित्रपटाला भरभरून यश मिळाले. 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने चित्रपटांविषयीची उत्कंठा वाढवली होती. अशातच रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केल असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT