Navardev B Sc. Agri Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navardev B Sc. Agri Poster Launch: प्रियदर्शनी इंदलकरचा नवा चित्रपट, हटक्या पद्धतीने झाला पोस्टर लॉन्च

Marathi Movie Poster Launch: शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव B Sc. Agri.’ चित्रपटाचं पोस्टर आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित झाला.

Chetan Bodke

Navardev B Sc. Agri Poster Out

तमाम तरूणाईच्या अगदी मनाजवळचा विषय म्हणजे लग्न! सध्या सर्वत्र लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक तरुणांना लग्नासाठी नवरी मिळत नाही. ही अवस्था सध्या सर्वत्र पाहायला मिळते. याच विषयाला अनुसरुन मोठया पडद्यावर एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव B Sc. Agri.’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज रिलीज झालंय. चित्रपटाचा पोस्टर लॉंचिंग इव्हेट आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाला. कारण बकासुर आणि सुंदर या बैलजोडीने हिरवा झेंडा दाखवत या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले.

आजच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालंय, असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. त्यातही जर शेतकरी तरूण असेल तर विचारायलाच नको. पण शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल.

पोस्टरमध्ये, क्षितीश मुंडावळ्या बांधून नवरीच्या प्रतिक्षेत असलेला दिसतोय. त्याला नवरी मिळणार की नाही याचं उत्तर आपल्याला २६ जानेवारीला थिएटरमध्ये मिळेल. अनोख्या पद्धतीने चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटाची बरीच चर्चा होते.

यावेळी क्षितीश, प्रियदर्शिनी, गार्गी फुले, रमेश परदेशी, दिग्दर्शक राम खाटमोडे, निर्माते मिलिंद लडगे आदी मान्यवर उपस्थित होते. आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT