Nana Patekar Upcoming Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar Web Series: नाना पाटेकर पुन्हा ओटीटीवर दिसणार, 'लाल बत्ती'मध्ये साकारणार महत्वाची भूमिका

नाना पाटेकर लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nana Patekar Upcoming Web Series: अभिनेते नाना पाटेकर लवकरच ओटीटी माध्यमातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहेत. सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर आधारित प्रकाश झा यांच्या 'लाल बत्ती' वेबसीरीजमध्ये ते दिसणार आहेत. नाना पाटेकर हे दिग्गज अभिनेते आहेत, तसेच ते अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय असतात.

उत्तम अभिनय आणि संवादांमुळे नाना पाटेकर यांचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. गेल्या काही वर्षांत नाना पाटेकर अभिनय क्षेत्रापासून दूर होते. पण आता नाना पाटेकर लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. (OTT)

'लाल बत्ती' वेबसीरीजमध्ये नाना पाटेकर वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. एका मुलाखती दरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांच्या पुनरागमनाबद्दल सांगितले आणि वेबसीरीज 'लाल बत्तीचा काम करणार असल्याचे म्हटले आहे. (Web Series)

नाना पाटेकर यांच्यासह टीव्ही अभिनेत्री मेघना मलिकही या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत मेघना नाना पाटेकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. मेघनाने छोट्या पडद्यावर अनेक हिट शोमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांनी मेघनाला 'ना आना इस देस लाडो', 'दहलीज', 'गुस्ताख दिल' सारख्या शोमध्ये काम केले आहे. (TV)

नुकताच नाना पाटेकर यांचा 'तडका' हा चित्रपट जी-फाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, श्रिया सरन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यापूर्वी नाना पाटेकर 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इट्स माय लाइफ' या चित्रपटात दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा समाजासाठी सर्वात मोठी बातमी! आरक्षणाची न्यायालयीन लढाई निर्णायक वळणावर, कोर्टात नेमकं काय झालं?

Maharashtra News Live Update: एमआयडीसीच्या भूखंडावर प्रशासनाची कारवाई, ३० भूखंडधारकांना नोटिसा

Pune Fort : सह्याद्रीत लपलेले रत्न! वीकेंडला करा लोणावळ्याजवळील 'या' किल्ल्यावर ट्रेक

UPI पेमेंटवर खरोखरच चार्ज लागणार का? अखेर सत्य समोर आलं, सर्वांनाच मिळाला दिलासा

Bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कुत्र्याने केला हल्ला; थोडक्यात वाचला जीव, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT