Namrata Sambherao Wishes Happy Birthday To Prasad Khandekar Instagram
मनोरंजन बातम्या

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Namrata Sambherao Post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकरचा आज वाढदिवस आहे. प्रसादला खास अंदाजात अभिनेत्री नम्रता संभेराव हिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Chetan Bodke

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकरचा आज वाढदिवस आहे. प्रसादला खास अंदाजात अभिनेत्री नम्रता संभेराव हिने इन्स्टाग्रामवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकरने आपल्या भारदस्त अभिनयाच्या जोरावर स्किट्सच्या माध्यमातून चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने एक खास पोस्ट शेअर केलेली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये नम्रताने २०१३ आणि २०२४ चा फोटो शेअर केलेला आहे. फोटो शेअर करताना नम्रताने कॅप्शन दिले की, "१० वर्षांच्या फ्रेंडशिपसाठी अभिनंदन, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पश्या, तू खूप टॅलेंटेड आणि मल्टीटास्कर व्यक्ती आहेस. त्यासोबतच तू एक सर्वोत्कृष्ट मुलगा आणि सर्वोत्कृष्ट मित्र आहेस."

"तुझ्याकडे सकारात्मकता मोठ्या प्रमाणावर आहे. खूप प्रेम पश्या खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ, तुझ्या उत्तमोत्तम प्रोजेक्ट्स ची लाईन लागू दे, सिनेमे नाटक सगळंच खूप गाजू दे, काहीही असो, पण मी तुझ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मी नेहमीच असेल. कारण माझ्या आयुष्यातल्या पहिल्या बक्षिसाची सुरुवात तू लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'कुर्रर्रर्र' नाटकापासून झाली आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला. धन्यावद आणि काळजी घे. आज हास्यदिन आहे किती सुंदर योगायोग..."

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासह १६ दमदार कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहे. दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकरचा हा पहिलाच चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

SCROLL FOR NEXT