Nagraj Manjule, Sayaji Shinde and Akash Thosar movie Ghar Banduk Biryani review Saam TV
मनोरंजन बातम्या

Ghar Banduk Biryani Review: सयाजी शिंदे-नागराज मंजुळेंचा नाद खुळा, 'घर बंदुक बिर्याणी'मध्ये चित्रपट हिट की फ्लॉप? वाचा सविस्तर

Nagraj Manjule Action Movie: 'घर बंदुक बिर्याणी' या चित्रपटाची कथा आकाश ठोसर उर्फ राजू भोवती फिरते.

Pooja Dange

Ghar Banduk Biryani Released: नागराज मंजुळे यांच्या 'घर बंदुक बिर्याणी' हा चित्रपट आज म्हणजे 7 एप्रिल 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत. हा अॅक्शन ड्रामा चित्रपट सुमारे 2 तास 41 मिनिटांचा आहे. या चित्रपटाला भारतीय सेन्सॉर बोर्डाने UA प्रमाणपत्र दिले आहे.

'घर बंदुक बिर्याणी' या चित्रपटाची कथा आकाश ठोसर उर्फ राजू भोवती फिरते. राजू (आकाश ठोसर)कोलागड परिसरातील ढाब्यावर नॉनव्हेज कुक म्हणून काम करत असतो. राजू अनाथ आहे आणि त्याला लग्न करायचे आहे आहे.

वधूच्या वडिलांना राजूचे स्वतःचे घर हवे आहे. सयाजी शिंदे उर्फ पल्लम यांच्या नेतृत्वाखाली एक डोकाईट ग्रुप ढाब्यात शिरतो आणि राजूला बिर्याणी चांगली बनवतो म्हणून पकडतो.

गुंडांसोबत राहत असताना राजूला समजते की गुंड पोलिसांना शरण आले तर पोलिस त्यांना घर देतात. त्यामुळे आता सायली पाटील उर्फ लक्ष्मीशी लग्न करू इच्छिणारा राजू गुंड बनतो आणि मग तो घरासाठी पोलिसांना शरण जाण्याचा विचार करतो. काही काळानंतर या गुंडांबद्दल पोलिसांना टिप देण्याचा विचार करतो.

या चित्रपटातील तिसरे मुख्य पात्र म्हणजे नागराज मंजुळे उर्फ पोलीस निरीक्षक राया पाटील ज्याची कोलागड भागात बदली होते आणि त्याला पल्लमला संपवायचे असते. पल्लम, राया पाटील आणि राजू आमनेसामने आल्यावर काय होईल? यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

'घर बंदुक बिर्याणी' या चित्रपटाची कथा नागराज मंजुळे आणि हेमंत आवताडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये डार्क कॉमेडीने आहे, पण दुसरा हाफ अॅक्शन आणि थोडा गंभीर आहे. कथा छान लिहिली आहे आणि संवादांनी कथा आणखी समृद्ध केली आहे. हा चित्रपट सुमारे 3 तासांचा आहे.

'घर बंदुक बिर्याणी' एक अॅक्शन चित्रपट आहे जो वास्तवाशी संबंधित नाही. तरीही, तुम्ही तीन मुख्य नायक आणि त्यांच्या वेगवेगळ्या जगाशी सहजपणे कनेक्ट होऊ शकता. झी स्टुडिओ आणि आटपाट प्रॉडक्शनचे यांचा हा चित्रपट आहे. चित्रपटातील पार्श्वसंगीत उत्कृष्ट आहे आणि गाणी यात मोलाची भर घालतात. सयाजी शिंदे यांनी नागराज यांनी चित्रपटामध्ये बाजी मारली आहे.

हेमंत आवताडे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती नागराज मंजुळे आणि भूषण मंजुळे यांनी केली आहे. छायांकन विक्रम अमलादी यांनी केले असून संकलन कुतुब इनामदार यांनी केले आहे. ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. घर बंदुक बिर्याणी चित्रपटाचे बजेट अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही परंतु ते सुमारे 8 ते 10 कोटी इतके असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT