Nagarjun, Naga Chaitanya and Samantha Ruth Prabhu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nagarjuna : सामंथा-नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर नागार्जुनचा मोठा खुलासा

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटला दुर्दैवी म्हणत नागार्जुनने मोठा खुलासा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साऊथचा सुपरस्टार नागार्जुन(Nagarjun) सोषक मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात त्याने अनिश शेट्टी उर्फ ​​नंदी अस्त्राची दमदार भूमिका साकारली आहे. तो अलीकडेच चित्रपटाचा निर्माता करण जोहरच्या कार्यालयात दिसला, जिथे त्याने चित्रपटाशी संबंधित त्याच्या अनुभवाबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांने मुलगा नागा चैतन्य आणि सून समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) यांचा डायवोर्स होण्याचे करण सांगितले आहे. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या डायवोर्सला दुर्दैवी म्हणत नागार्जुनने मोठा खुलासा केला आहे.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटावर बोलताना नागार्जुनने सांगितले की, 'तो खूश आहे, एवढंच मला दिसत आहे. हे माझ्यासाठी पुरेस आहे. हा त्याला आलेला दुर्दैवी अनुभव आहे. आपण त्याबद्दल सतत बोलू शकत नाही. ती त्याच्या आयुष्यात नाही. असे कोणासोबतही होऊ नये असे मला वाटते.

या वर्षाच्या सुरुवातीला, नागार्जुनने चैतन्य आणि सामंथा यांच्या घटस्फोटाच्या विधानाच्या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी जानेवारीमध्ये ट्विट केले होते, 'समांथा आणि नागा चैतन्य यांच्याबद्दलच्या माझ्या विधानाचा हवाला देत सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये फिरत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. मी मीडिया मित्रांना विनंती करतो की कृपया बातम्या म्हणून अफवा पोस्ट करणे टाळावे. त्याने हॅशटॅगमध्ये लिहिले 'अफवा नको, बातम्या द्या.'

नागार्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले तर, नागार्जुन नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र: शिवा' चित्रपटात दिसला होता, हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये नागार्जुनने ब्रह्मास्त्राच्या रक्षक ब्रह्मांश नंदियास्त्राची भूमिका साकारली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिक्रिया देऊन भरपूर कमाई केली होती.

Edited By - Shruti Kadam

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT