Naga Chaitanya Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला किस करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Naga Chaitanya First Kissing Moment: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य चित्रपटात त्याच्या सहकलाकार अभिनेत्रीला किस करताना घाबरला होता. ही अभिनेत्री कोण जाणून घ्या.

Shreya Maskar

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी नागा चैतन्यचे लग्न दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी झाले होते. आज म्हणजे (23 नोव्हेंबर) ला नागा चैतन्यचा वाढदिवस आहे. हा नागा चैतन्यचा ३८ वा वाढदिवस आहे.

नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) ६ ऑक्टोबर २०१७ रोजी लग्नबंधनात अडकले होते. यांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने लग्न केले. त्याचा शाही पद्धतीने लग्न सोहळा पार पडला होता.

नागा चैतन्य आणि समांथाची पहिली भेट २००९ मध्ये 'ये माया चेसावे' चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर कालांतराने 'ऑटोनगर सूर्या' चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले. तेव्हा त्यांच्यात छान मैत्री झाली आणि पुढे ते एकमेकांना डेट करू लागले. त्यांनी दोन वर्ष एकमेकांना डेट केले. याचा लग्नसोहळा गोव्यात पार पडला. मात्र त्यांचा संसार जास्त काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या ४ वर्षानंतर म्हणजे 2021 ला हे दोघ विभक्त झाले.

नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभूची जोडी खूप लोकप्रिय होती. एका मिडिया मुलाखती दरम्यान नागा चैतन्यने आपल्या पहिल्या किसची कहाणी सांगितली होती. लग्नाआधी समांथा आणि नागा चैतन्य लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

समांथा आणि नागा चैतन्य पहिली किस रिलेशनमध्ये येण्याअगोदरच झाली होती. 'ये माया चेसावे' या चित्रपटादरम्यान एका सीनसाठी त्याने समांथाला किस्स केली होती. मात्र किसिंग सीन करण्यापूर्वी नागा चैतन्य घाबरला होता. त्यांचा 'ये माया चेसावे'हा तेलुगू चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT