Naagin 7 Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Naagin 7 Video : शत्रूंचा नाश करायला येतेय 'नागिन'; बिग बॉसमधील २ स्पर्धकांची वर्णी, वेळ अन् तारीख काय?

Naagin 7 Release Date : एकता कपूरचा शो 'नागिन 7'ची रिलीज डेट समोर आली आहे. तसेच शोमध्ये बिग बॉसमधील अनेक स्पर्ध पाहायला मिळणार आहे. तारीख आणि वेळ जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'नागिन 7' हा एकता कपूरचा शो आहे.

'नागिन 7'मध्ये प्रियंका चाहर चौधरी नागिनची भूमिका साकारणार आहे.

'नागिन 7'मध्ये बिग बॉसचे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

अखेर प्रतिक्षा संपली. 'नागिन 7'ची (Naagin 7) रिलीज डेट समोर आली आहे. ज्यामुळे चाहते शो पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. सलमान खानच्या 'बिग बॉस 19'च्या 'वीकेंड का वार'मध्ये एकता कपूरने 'नागिन 'चा चेहरा दाखवला आहे.'नागिन 7'ची मुख्य हिरोईन दुसरी-तिसरी कोणी नसून प्रियंका चाहर चौधरी (Priyanka chahar Choudhary) आहे. नुकताच 'नागिन 7' चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात इतर कलाकारांचे चेहरे पाहायला मिळत आहेत.

प्रोमोची सुरुवातीला करण कुंद्राची झलक पाहायला मिळतो. तो कोणत्या तरी संकटाबद्दल बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे ईशा सिंह आणि प्रियंका चाहर चौधरी नाग मंदिराबाहेर उभे राहून बोलताना दिसत आहेत. ईशा प्रियंकाला सांगते, "हे नाग मंदिर आहे. असे म्हटले जाते की, इच्छा पूर्ण करणारे नाग आणि नाग येथे भेटतात." त्यानंतर प्रियंका नागात रूपांतरित होताना दिसते. 'नागिन' आपल्या शत्रूंना हरवण्यासाठी तयार आहे. या सीझनमध्ये 'नागिन' चा सामना ड्रॅगनसोबत होताना दिसणार आहे.

'नागिन 7' कधी सुरू होणार?

'नागिन 7' च्या व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आपका हुकूम सारखों पर! तैयार हो जाइये देखना नागिन की नई दास्तान!"'नागिन 7' हा शो 27 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही धमाकेदार कहाणी शनिवार- रविवार रात्री 8 वाजता कलर्स टिव्ही आणि जिओ हॉटस्टार पाहता येईल.

'नागिन 7' हा एकता कपूरचा शो आहे. आजवर नागिनच्या भूमिकेत अनेक प्रसिद्ध अभिनेत्री झळकल्या आहेत. यात मौनी रॉय, सुरभि ज्योति, अनिता हसनंदानी, निया शर्मा, जैस्मिन भसीन, सुरभि चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांचा समावेश आहे. प्रियंका चाहर ही टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.करण कुंद्रा, प्रियंका , ईशा सिंह हे सर्व बिग बॉसचे सदस्य आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT