Naagin 7  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Naagin 7 : मौनी रॉय, तेजस्वी प्रकाशनंतर कोण बनली 'नागिन'? चेहरा आला समोर, पाहा VIDEO

Ekta Kapoor To Reveal Naagin 7 Actress : 'बिग बॉस 19'च्या 'वीकेंड का वार'मध्ये एकता कपूर आली होती. बिग बॉसमध्ये 'नागिन 7' च्या मुख्य अभिनेत्रीचा चेहरा दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या 'वीकेंड का वार'मध्ये एकता कपूर आली.

'वीकेंड का वार'ला 'नागिन 7' च्या मुख्य अभिनेत्रीचा चेहरा समोर आला.

'नागिन 7' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अखेर तो क्षण आला. 'नागिन 7' च्या (Naagin 7) मुख्य अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे. सलमान खानच्या 'बिग बॉस 19'च्या 'वीकेंड का वार'मध्ये एकता कपूरने 'नागिन 'चा चेहरा दाखवला आहे. खूप वेळापासून 'नागिन 7'ची हिरोइन कोण असेल याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. प्रामुख्याने दोन नावे समोर आली होती. एक प्रियंका चाहर चौधरी (Priyanka chahar Choudhary) आणि दुसरी ईशा मालवीय. आता मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

'नागिन 7'मध्ये मुख्य भूमिकेत दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी झळकणार आहे. 'बिग बॉस 19'च्या मंचावर तिचा चेहरा दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकता कपूरचा 'नागिन' शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद आहे. अलिकडेच 'नागिन 7' चा प्रोमो शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते मुख्य अभिनेत्रीची उत्सुकतेने वाट पाहत होते. आता प्रियंका मालिकेत 'नागिन'ची भूमिका कशी साकारते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

प्रियंका चाहर वर्कफ्रंट

प्रियंका चाहर ही टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'उडारियां'मधून प्रियंका चाहर चौधरीला खूप लोकप्रियता मिळाली. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. प्रियंका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 4.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. ' दस जून की रात' या वेब सीरिजमध्ये प्रियंका चाहर दिसली. सध्या तिच्यावर चाहते आणि कलाकार मंडळीकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'नागिन 7' कधी सुरू होणार?

मीडिया रिपोर्टनुसार, 'नागिन 7' नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे बोले जात आहे. आजवर नागिनच्या भूमिकेत अनेक प्रसिद्ध अभिनेत्री झळकल्या आहेत. यात मौनी रॉय, सुरभि ज्योति, अनिता हसनंदानी, निया शर्मा, जैस्मिन भसीन, सुरभि चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांचा समावेश आहे. प्रेक्षक 'नागिन 7' ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT