Shruti Vilas Kadam
अभिनेत्री मौनी रॉयने नुकताच तिचा लेटेस्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा ग्लॅमरस अवतार चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहे.
मौनीने घातलेला रेड आणि व्हाइट कॉम्बिनेशनचा ड्रेस खूप आकर्षक दिसतो आहे. चमकदार कापडामुळे तिचा लुक अधिक रॉयल आणि एलिगंट दिसतो.
फोटोशूटमध्ये मौनीने दिलेल्या पोजेसमधून तिचा आत्मविश्वास आणि फॅशनसेंस स्पष्टपणे दिसतो. चाहत्यांनी तिच्या बोल्ड स्टाइलचं कौतुक केलं आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी “गॉर्जियस”, “क्वीन”, “स्टनिंग” अशा कमेंट्स केल्या.
मौनी नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. तिचा हा नवा अवतार पुन्हा एकदा तिचं “फॅशन आयकॉन” असलेलं स्थान अधोरेखित करतो.
सध्या मौनी तिच्या पुढील चित्रपट आणि वेब-शोच्या तयारीत आहे. या फोटोशूटमुळे तिच्या प्रमोशनल लुकबद्दलही चर्चा रंगली आहे.
तिचे हे फोटो काही तासांतच सोशल मीडियावर ट्रेंड झाले. चाहत्यांनी या लुकला “परफेक्ट दिवाळी ग्लॅम” म्हटलं आहे.