Shruti Vilas Kadam
मेथीच्या पाण्यात असणारे फायबर पचन सुधारते. गॅस, अजीर्ण, आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करून पोट हलके वाटते.
मेथी पाणी पोटात जास्त वेळ राहते, त्यामुळे भूक कमी लागते आणि अनावश्यक खाणं टाळलं जातं. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
मेथीमधील नैसर्गिक घटक इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी हे पाणी फायदेशीर ठरू शकते.
हे “वाईट” कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून “चांगले” कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन, मासिक पाळी अनियमितता किंवा पीसीओडी सारख्या समस्यांवर मेथीचं पाणी उपयुक्त ठरतं.
मेथीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमक देतात, मुहासे कमी करतात आणि केसगळती रोखण्यास मदत करतात.
मेथीतील सैपोनिन्स आणि फेनोलिक घटक शरीरातील सूज कमी करतात आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.