Shruti Vilas Kadam
अभिनेत्री दिप्ती भागवत या “अ परफेक्ट मर्डर” या नाटकातून ‘मीरा’ ही प्रमुख भूमिका साकारत आहेत. हे नाटक सुप्रसिद्ध चित्रपटकार सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या क्लासिक कथानकावर आधारित आहे. यापूर्वी हे पात्र दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे साकारायची.
लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या थ्रिलरला मराठी संवेदनांचा साज चढवला आहे. “मूळ कथेला मराठी स्पर्श देणं ही मोठी कसोटी होती,” असं दिप्ती म्हणतात.
दिप्तीची भूमिका श्रीमंती, सौंदर्य आणि आत्मविश्वासाने झगमगणारे असे आहे. पण तिच्या अंतर्मनात गोंधळ आणि प्रश्नांचे वादळ आहे. ती दोषी आहे की बळी हे नाटकातच उलगडतं.
दिप्ती सांगतात, “या भूमिकेत भावनिक खोली आणि संयम दोन्ही लागतात. काही संवाद शब्दात नाहीत. तर नजरेने आणि शांततेने बोलतात.” प्रत्येक पॉझ प्रेक्षकांशी संवाद साधतो.
दिप्ती या अनुभवाला “शिकण्याचा प्रवास” म्हणतात. “प्रत्येक तालमीत विजय सरांनी ‘मीरा’ची नवी बाजू दाखवली. त्यामुळे पात्र मी आतून जगू शकले,” असं त्या सांगतात.
या नाटकात अनिकेत विश्वासराव, श्वेता पेंडसे, राहुल पेठे, सुबोध पंडे आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकारही आहेत. दिप्तीच्या मते, त्यांच्यासोबत काम करणं ‘सहज आणि प्रेरणादायी’ ठरलं.
आयकॉनिक रॉयल ऑपेरा हाऊस येथे ५ नोव्हेंबर रोजी सायं. ७ वाजता या नाटकाचा सहावा प्रयोग होणार आहे. दिप्ती म्हणतात, “हे फक्त रहस्य नाटक नाही. तर भावना आणि सस्पेन्सचा जिवंत अनुभव आहे.”