Shruti Vilas Kadam
थंडीत हवेमुळे त्वचेची नमी झपाट्याने कमी होऊ शकते. त्यामुळे अंघोळीनंतर त्वचेवर लगेच मॉइस्चरायझर लावणे आवश्यक आहे, विशेषतः ड्राय त्वचेकरिता ऑईल-बेस्ड किंवा शीया बटर असलेली क्रीम योग्य.
थंडीमध्ये अंगातील हायड्रेशन कमी होण्याची समस्या वाढते. म्हणून दिवसभरात पुरेसे पाणी पिणे, गरम हर्बल टी किंवा सूपचा समावेश करणे त्वचेसाठी फायदेशीर.
थंडीत त्वचेवर मृत कोशिका जमा होतात, यामुळे त्वचा निर्जीव व सपाट दिसू शकते. म्हणून आठवड्यातून १–२ वेळा हलका स्क्रब करा.
बहुतेक लोक थंडीत खूप गरम पाण्याने अंघोळ करतात. पण त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलं निघून जाते आणि ड्रायनेस वाढते. त्याऐवजी कोमट पाणी वापरा.
थंडीत त्वचा संवेदनशील होते, त्यामुळे हार्श केमिकलस किंवा सुगंधित उत्पादनांऐवजी हायड्रेटिंग फेस वॉश, न्यूट्रल pH, अल्कोहॉल-मुक्त मॉइस्चरायझर वापरणे उचित आहे.
त्वचेची काळजी फक्त बाहेरून नाही तर आतून देखील होत असते. विटामिन A, C, E, ओमेगा-3 व योग्य फळ-भाजींचा समावेश त्वचेला फायदेशीर असतो.
सर्दीतही सूर्याची किरणे त्वचेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी SPF 30 असलेला सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.