Myra Vaikul Saam Tv
मनोरंजन बातम्या

Myra Vaikul: मायरा वायकूळला 'या' बॉलिवूड सुपरस्टारसोबत करायचंय काम, व्यक्त केली मनातली इच्छा

Child Actor Myra Vaikul: मायरा वायकूळ आगामी काळात रूपेरी पडद्यावर एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील बालकलाकार मायरा वायकूळ सर्वांच्याच परिचयाची आहे. मायरा वायकूळ आगामी काळात रूपेरी पडद्यावर एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे. याचदरम्यानची मायराची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मायराने अत्यंत कमी वयात तिचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. अभिनय असो की तिचा हजरजबाबीपणा मायरा नेहमीच ओळखली जाते. मायराने लहान वयातच तिच्या कौशल्यामुळे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केले. या मालिकेत तिने साकारलेली परी ही व्यक्तीरेखा सर्वांनाच भावली. आजही मायरा परी या नावाने ओळखली जाते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मायराला अनेक प्रश्न विचारण्यात आली. गोंडस आणि हुशार मायराने या सर्वच प्रश्नांची उत्तर दिली. यामध्ये मायराला तुला भविष्यात कोणत्या कलाकारसोबत काम करायचंय असा प्रश्न विचारण्यात आला यावर मायराने सांगितलं की मला बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोबत काम करायचं आहे. यानंतर तु अभिनेता सलमान खानला भेटली आहे का असं विचारण्यात आलं यावर मायराने मी अजूनही सलमान खानला भेटली नसल्याचं सांगितलं आहे. मायराने तिला बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बालकलाकार मायराचा मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा आज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मायराची भूमिका मुख्य आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संकेत माने यांनी केलं आहे. चित्रपटात मायरा वायकूळसह मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, स्पृहा परब, पूजा सांवत ही कलाकार मंडळी देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT