myra new movie mukkam post devach ghar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Myra Vaikul : छोटी मायरा झळकणार 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात

Myra Vaikul : बालकलाकार मायराच्या वायकुळ टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय झाली आहे. तिने फार लहानपणीच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिल्सद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Myra Vaikul : टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते.

ए सी डी कैटचे मनीष कुमार जायसवाल आणि साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली असून या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या निमित्ताने प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण केले आहे. किमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार - महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.

अल्पावधीतच महाराष्ट्रभर पोहचलेल्या मायरा वायकुळची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत,सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात मायराची भूमिका नक्की कोणती आहे? सोशल मीडियावर सुरु असलेल्या पोस्टकार्डच्या प्रमोशनचा चित्रपटाशी नक्की कसला संबंध आहे? यांसारख्य सगळ्या प्रश्नांची उकल ३१ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.

दरम्यान, बालकलाकार मायराच्या वायकुळच्या छोट्या भावाचा नामकरण सोहळा नुकताच राजेशाही थाटात पार पडला. मायराच्या युट्यूब चॅनेलवर ‘व्योम’च्या नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी मराठीच्या मालिकेतून मायराने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. मायराने कलर्स टीव्हीवरील ‘नीरजा एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत ही काम केले होते. तसेच परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या मराठी चित्रपटात मायरा झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: खेडमधील पिकअप अपघातातील ९ मृतांची नावं आली समोर, पापळवाडी गावावर शोककळा

Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यर पास; हार्दिक पांड्या वेटिंगवर तर सूर्या दादाबाबत सस्पेन्स

Janhvi Kapoor: परम सुंदरीचा नविन फ्लॉरल साडी लूक पाहिलात का?

बनावट शाळा आयडी प्रकरणात कारवाईचा धडाका; हजारो लाडक्या शिक्षक रडारवर|VIDEO

Maharashtra Live News Update: मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी

SCROLL FOR NEXT