Ham 2 Hamare 12 Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hum Do Hamare Baarah : 'हम २ हमारे १२'च्या टीमला अज्ञातांकडून धमकीचा फोन, टीमकडून सुरक्षेची मागणी

Hum Do Hamare Baarah Movie : 'हम २ हमारे १२' चित्रपटाला विरोध होत असताना चित्रपटातील कलाकारांना एका अज्ञाताकडून धमकीचा फोन आला असल्याची माहिती खुद्द अभिनेता अन्नू कपूरने दिलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अन्नू कपूरचा 'हम २ हमारे १२' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाला काही धार्मिक संघटनांनकडून विरोध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रझा अकादमीकडून विरोध करण्यात आला होता. सध्या चित्रपटाला वेगवेगळ्या ठिकाणांहून विरोध होत असताना चित्रपटातील कलाकारांना एका अज्ञाताकडून धमकीचा फोन आला असल्याची माहिती खुद्द अभिनेता अन्नू कपूरने दिलेली आहे.

चित्रपटाच्या टीमसह दिग्दर्शकांनी मुंबई पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी आणि गृह खात्याने आम्हाला सुरक्षा पुरवावी अशी मागणी कलाकारांनी केलेली आहे. नाशिकमध्ये सोमवारी काही धार्मिक संघटनांकडून चित्रपटाला विरोध केला होता. येत्या ७ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे, पण त्या आधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

धार्मिक भावना दुखवणारे काही सीन्स टीझरमध्ये दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या चित्रपटाला धार्मिक संघटनेकडून विरोध केला जात आहे. सोशल मीडियावरून टीझर आणि ट्रेलरही त्वरित डिलीट करण्यात यावा, अशी मागणी रझा अकादमीचे सदस्य सईद नुरी आणि माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केली आहे. टीझर आणि ट्रेलर जर डिलीट झाला नाही तर, कायदेशीर आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांत धाव घेतल्यानंतर अभिनेता अन्नू कपूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "पोलिसांनी आणि गृह खात्याने आम्हाला सुरक्षा पुरवावी. चित्रपटातल्या कलाकारांना आणि दिग्दर्शकांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तरीही मुंबई पोलिसांनी, गृह मंत्रालयाने आम्हाला पोलिस सुरक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे." असं अभिनेता अन्नू कपूरने सांगितले.

चित्रपटाबद्दल सांगायचे तर, चित्रपटाचे दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केले असून चित्रपट येत्या ७ जूनला रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, अन्नू कपूर, पार्थ समथान, आश्विनी कळसेकर, मनोज जोशी, पारितोष त्रिपाठी, राहूल बग्गा सह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

AI Love Story : तरुणी AI चॅटबॉटच्या प्रेमात आंधळी; 5 महिन्यांच्या डेटिंगनंतर गुपचूप उरकला साखरपुडा

Stomach Infection: पोटात इन्फेक्शन असेल तर दिसतात 'ही' लक्षणं

SCROLL FOR NEXT