Nirmal Mukherjee Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nirmal Mukherjee: वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन

मंगळवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Pooja Dange

Nirmal Mukherjee Death: 'अशी चिकमोत्याची माळ' हे गाणं संगीतबद्ध केलेले संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन झाले आहे. बुधवारी पहाटे हिरानंदानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूवेळी त्यांचे वय ७१ वर्ष होते. निर्मल मुखर्जी विविध पाश्चिमात्य वाद्यांवर उत्तम पकड होती.

मंगळवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. मुंबईतील साकीनाका येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निर्मल मुखर्जी यांचे वडील चित्रपट निर्माते होते. दादर येथील त्यांचा मालकीच्या हॉलमध्ये अनेक संगीतकार आणि वादक सरावासाठी येत असते. या वातावरणाचा परिणाम निर्मल यांच्यावर झाला. एवढ्या वयाच्या १४ व्या वर्षी ते म्युझिक असोसिएशनचे सदस्य झाले.

बॉन्गो, काँगो, तुंबा, दबुरका, डी- जेंबे विविध वाद्यांवर त्यांची हुकूमत होती. पंधरा हजाराहून जास्त गाण्यात त्यांचा सहभाग होता. हिंदीसह त्यांनी बंगाली आणि मराठी गाण्यांसाठी त्यांनी संगीतकार आणि वादक म्हणून काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये रंगणार सत्तासंघर्षाचा आखाडा; Gen Zसाठी सत्ताधाऱ्यांचा गेमचेंजर प्लॅन?

Drought Relief: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 75 हजार मदत? सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

SCROLL FOR NEXT