MUSANDI Marathi Movie Teaser Out Saam TV
मनोरंजन बातम्या

MUSANDI Marathi Movie Teaser Out: समाजाचे दाहक वास्तव दाखविणाऱ्या 'मुसंडी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Musandi Movie Teaser: मुसंडी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Pooja Dange

Marathi Movie Musandi Teaser Out: मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन विषय आणि आशय घेऊन चित्रपट आपल्या भेटीला येत असतात. ग्रामीण भागातील विषय असोत, सामाजिक समस्या असोत किंवा तरुणांचे प्रश्न असे अनेक विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडले जातात. असाच एक चित्रपट 'मुसंडी' आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच मुसंडी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये तुम्हाला एक लव्ह स्टोरी, एका मुलाच्या संघर्षाची कथा आणि व्याकुळ आई-वडील आपल्याला पाहायला मिळत आहे. या सर्वांचा संघर्ष आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

स्पर्धा परीक्षांच्या कठोर स्पर्धेतून यश मिळवणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचं कौतुक होत असताना दुसरीकडं अपयशी ठरलेले विद्यार्थी वेगळ्याच समस्यांना तोंड देतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारी दरम्यान व्यक्तिमत्त्व विकासापासून ज्ञानसंपन्नतेपर्यंत गोष्टी होत असताना या स्पर्धेमुळं उभे राहणारे अनेक सामाजिक प्रश्‍नही मोठे आहेत. यावर भाष्य करणारा मुसंडी हा चित्रपच लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. (Latest Entertainment News)

सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित-निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी' या मराठी चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या २६ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेमध्ये अपयश आल्याने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागण्याची जिद्दच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल, हा संदेश पोहचवणारा ‘मुसंडी’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्यातल्या आत्मविश्वासाची जाणीव करून देईल, असा विश्वास दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केला.

रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी ‘मुसंडी’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे, सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे, राम गायकवाड, अजित पवार, उत्कर्ष देशमुख, सार्थक वाईकर, आर्यन पवार, निमिशा सानप, रुचिता देशमुख, प्रियंका पवार, ऐश्वर्या फटांगरे, श्रद्धा गायकवाड, सोनाली गायकवाड, आकांक्षा कापे, प्राजक्ता गायकवाड, मानसी डरंगे, भाग्यश्री पवार यांच्या देखील भूमिका आहेत.

एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा अमुक एक ‘पॅटर्न’ नसतो. तीव्र इच्छाशक्ती, ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत, अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभं राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर यशाची 'मुसंडी' मारता येऊ शकते. हे या चित्रपटामध्ये दाखविण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू

Dry Clothes Without Sun : उन्हाशिवाय कपडे कसे वाळवायचे?

Sindhudurg : मालवण समुद्रात मासेमारी नौका बुडाली; एक मच्छीमार बेपत्ता, दोघे बचावले

Monsoon Waterfalls: निसर्ग सौंदर्य नयनरम्य दृश्य; सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा चमत्कार, रंधा धबधबा प्रवाहित| VIDEO

Guru Purnima 2025: यंदा गुरूपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मूहूर्त, तारिख आणि तिथी

SCROLL FOR NEXT