Babita Birthday Celebration Saam TV
मनोरंजन बातम्या

Munmun Dutta Birthday Celebration: जेठालाल कुठेय? बबिताच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये चाहत्यांना जाणवली अभिनेत्याची अनुपस्थिती

Munmun Dutta Share Video: मुनमुन दत्ताने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Pooja Dange

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Celebration:

'तारक मेहता का उलट चष्मा' ही मालिका गेली १४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व पात्र अनेकांच्या जगण्याचा भाग झाली आहेत. या मालिकेवर आणि या मालिकेतील कलाकार प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

'तारक मेहता का उलट चष्मा' या मालिकेतेची सुंदर अभिनेत्री मुनमुन दत्ताचा २८ सप्टेंबरला वाढदिवस होता. मुनमुन ३६ वर्षांची झाली आहे. मुनमुनने तिचा वाढदिवस 'तारक मेहता...' च्या सेटवर साजरा केला आहे.

'तारक मेहता का उलट चष्मा' मालिकेत बबिता हे पात्र साकारणारी मुनमुन दत्ताने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुनमुन दत्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मुनमुन दत्ता खूप आनंदी दिसत आहे. नाचत-गात मुनमुन केक कट करायला आली. मुनमुनने केक कट केल्यानंतर तिच्या सहकालकरांना आणि टीममधील इतर सदस्यांना केक भरवला देखील.

दरम्यान हा व्हिडीओ शेअर करत मुनमुन दत्ताने लिहिलं आहे, 'आणि अशा प्रकारे मी माझ्या वाढदिवसाची सुरुवात केली! माझ्या टीमचे आभार ज्यांनी मला असे काहीतरी करायला लावले जे मला क्वचितच करायला आवडते आणि आम्ही सेटवर केक कापला. सेटवर उपस्थित राहून माझ्या वाढदिवसाला हजर राहिल्याबद्दल आणि या छोट्याशा सेलिब्रेशनचा एक भाग असल्याबद्दल माझ्या सर्व आवडत्या लोकांचे आभार. आज शूटिंग न करणाऱ्या प्रत्येकाला मिस केले. (पार्टी अजून बाकी आहे.)

शेवटी, मी या जीवनासाठी कृतज्ञ आहे, निरोगी, आनंदी आणि समृद्ध असल्याबद्दल कृतज्ञ आहे. मी खूप धन्य आणि नम्र आहे. आणि हो, मी स्वतःची फेवरेट आहे.'

परंतु या सर्व सेलिब्रेशनमध्ये नेटकऱ्यांना एक गोष्ट खटकली. त्यांनी मुनमुन दत्ता यांच्या पोस्टवर कमेंट करत ही खंत बोलून देखील दाखवली आहे. मुनमुन दत्ता यांच्या बिर्थडे सेलिब्रेशनमध्ये जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी दिसले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Onion Juice: जाड अन् घनदाट केस हवीयेत? लावा कांद्याचा रस, काही दिवसातच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT