Raj Kundra
Raj Kundra saam tv
मनोरंजन बातम्या

Raj Kundra: राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र; काय आहे संपूर्ण प्रकरण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raj Kundra: पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राज कुंद्रासोबतच अन्य काही आरोपीं विरोधात अजुन काही पुरावे पोलिसांनी कोर्टासमोर दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. 2021 मधील पॉर्नोग्राफी प्रकरणी राजला अटक करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी, आयटी प्रमुख रायन थॉर्पला गेल्या वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये ५०,००० इतका जामिन मंजूर करण्यात आला होता. या दोघांवरही कोर्टाने लावलेल्या कलमांमध्ये ७ वर्षांहून अधिक काळातील शिक्षेची तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे मुंबईतील किला कोर्टाने या दोघांनाही जामिन मंजूर केला होता.

2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा आणि त्याच्या चार साथीदारांसह मुंबई पोलिसांनी तब्बल दिड हजार पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले होते. त्यात राज कुंद्राचा नातेवाईक प्रदीप बक्षी आणि दुसरा आरोपी यश ठाकूर यांचा समावेश आहे. या सर्वांवर पोलिसांनी पीडित मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक केल्याचा आरोप करत माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी हे आरोप केले होते.

सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात कुंद्राच्या मोबाईलमधील इतर आरोपींसोबतचे मेसेज आणि लॅपटॉपमध्ये ६० हून अधिक आरोपींचे सापडलेले अश्लिल व्हिडिओ क्लिप्स पोलिसांनी जोडले होते. त्यामुळे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनेक आरोप या आरोपपत्रात जोडले आहेत. सोबतच राज कुंद्रा 'आर्म्स प्राईम' या कंपनीचे फेब्रुवारी- डिसेंबर या काळात संचालकपद भूषविले.

त्यावेळी हॉटशॉटमध्ये उत्पन्न झालेला महसूल आणि पैसे केनरिन कंपनीच्या लॉयन्स बॅंक ऑफमध्ये जमा करण्यात आले. प्रदिप बक्षी लंडनमधील केनरिन कंपनीचे संचालक होते. आरोपी, साक्षीदारांचे जबाब, ईमेल आणि संगणकावरील मिळालेल्या माहितीप्रमाणे, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2019 पर्यंत गूगलकडून 20, 24, 776 रुपये मिळाले, तर अॅपलकडून ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत 1,16,58,925 रुपये मिळाल्याचे आरोपत्रात नमूद करण्यात आले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

2021 मध्ये 4 फेब्रुवारी रोजी पोलीसांनी मुंबईतील मालाडमध्ये मालवणी येथील एका बंगल्यावर छापा टाकला होता. या बंगल्यात अश्लिल चित्रपट चित्रीत केले जात असून त्यासाठी मुलींवर दबाव टाकला जात होता, असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी बंगल्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. आणि नंतर पोलिसांनी 9 जणांना बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात मुंबई पोलीसांनी सर्वात आधी 3 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर जुलै महिन्यात राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार थॉर्पला अटक करण्यात आली. त्या आरोपपत्रात कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना वॉण्टेड जाहीर करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT