17 Foreign people got arrested in Mumbai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai News : मुंबईत वेबसीरीज तयार करणाऱ्या परदेशी कलाकारांविरोधात गुन्हा नोंद; कारण?

मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात 17 परदेशी अभिनेते आणि अभिनेत्री विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Pooja Dange

Mumbai News: मुंबईमध्ये अनेकजण काम करण्यासाठी येत असतात. कामानिमित्त होणाऱ्या या स्थलांतरामध्ये आता परदेशी नागरिकांचा देखील समावेश झाला आहे. प्रवासी विजा घेऊन 17 परदेशी कलाकार वेबसीरीजमध्ये काम करण्यासाठी भारतात आले होते. या सर्व कलाकारांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्व कलाकरांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच प्रवासी विजा घेऊन कामासाठी आलेल्या या कलाकारांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात 17 परदेशी अभिनेते आणि अभिनेत्री विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात दहा महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व लोक प्रवासी विजा घेऊन मुंबईत आले होते आणि वेब सीरिजचे शूटिंग करत होते. दहिसर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस चित्रीकरणाच्या स्थळी पोहोचले. पोलिसांनी चित्रीकरण थांबवून तपास केला. तपासातून या सर्व विदेशी कलाकारांनी विजा नियमांचे उल्लंघन केल्याचं निष्पन्न झाले आहे. या सर्व परदेशी कलाकारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Web Series)

दहिसर पोलीस ठाण्यातील ताब्यात घेतलेल्या कलाकारांकडे शूटिंगसाठीची परवानगी देखील होती. यातील काही लोक डान्सर तर काही बॅक स्टेज कलाकार आहेत. हे सर्व कलाकार डेली बेसिसवर पगार घेऊन काम करत होते. यातील बरेचसे कलाकार रशिया आणि युकेतील विविध देशांमधील आहेत.पोलिसांनी या सर्व कलाकारांविरोधात फॉरेन 1946 नुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच पोलीस आता पुढील तपास करत आहे. (Mumbai Police)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT