Mumbai News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Mumbai Lokhandwala Model News: अंधेरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. लोखंडवाला परिसरात एका मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Siddhi Hande

अंधेरी लोखंडवाला परिसरात धक्कादायक घटना

मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला येथे एका एका मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

लोखंडवाला परिसरात अरीना बिल्डिंगच्या गेटवर ही घटना घडली आहे. या ठिकाणी मॉडेलच्या अंगावर गाडी घालून तिला जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा तिथे आजूबाजूला माणसे होते. यावेळी बचाव करण्यासाठी दोन व्यक्ती धावून गेले. मात्र त्या व्यक्तीने त्या तिघांवरही पुन्हा गाडी अंगावर घालण्याच्या प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काल रात्री 9:30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.याप्रकरणी मॉडेलने तक्रार केली आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल

मॉडेलच्या तक्रारीवरून अंगावर गाडी घालण्याच्या प्रयत्न करणारा व्यक्तीचे नाव समोर आले आहे. मोहम्मद शकील शेखने (वय 29 वर्षे) हा गुन्हा केला आहे. त्याच्याविरोधात ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मोहम्मद शकील शेख कडून मॉडेलच्या मैत्रिणीच्या स्नॅपचॅट वर ऍसिड अटॅक करण्याची धमकी देण्यात आली होती. या संदर्भात मॉडेलने या आरोपीला विचारणा केली असता आरोपी मोहम्मद शेख ला राग आला.त्याने काल संध्याकाळी साडेनऊच्या सोमवार मॉडलचे इमारती गेट बाहेर बोलवून घेतले. त्यानंतर तिच्या अंगावर कार घालण्याच्या प्रयत्न केला.

अपघात कसा झाला?

आरोपीने स्कोडा कारने मॉडेलला धक्का दिला. त्यानंतर बोनेटवरुन तिला फरफटत पुढे घेऊन गेला. या घटनेमध्ये मॉडेल किरकोळ जखमी झाली आहे.मॉडेलच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मोहम्मद शेख विरोधात गुन्हा दाखल झाला असून ओशिवरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

चंद्रग्रहणाचं सूतक ठरलं काळ! स्नानासाठी गेलेल्या ६ चिमुरड्यांचा वेदनादायी अंत; वाचा नेमकं काय घडलं?

Petrol: पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड, पाहा VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Short Hair Hairstyles: छोट्या केसांवर उठून दिसतील या 5 हेअरस्टाईल्स, तुम्हीही नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT