Marathi Natak  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Natak : प्रसिद्ध अभिनेते घेऊन येतायेत नवं नाटक! मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत सस्पेन्सचा थरार, २३ व्या मजल्यावर नेमकं काय घडलं?

Marathi Natak Announcement : प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रंगभूमीवर नवीन नाटक आले आहे. यात सस्पेन्स थ्रिलर पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत नेमकं काय घडणार, जाणून घ्या.

Shreya Maskar

रंगभूमीवर लवकरच नवं कोरं नाटक

दोन मराठमोळे अभिनेते समोरासमोर

मैत्री आणि विश्वासघाताचा थरार

मराठी रंगभूमीवर एक थ्रिलर नाटक आले आहे, ज्यात मराठी मनोरंजन विश्वातील चमकते तारे पाहायला मिळणार आहे. नाटकाचे नाव '२३ वा मजला' असे आहे. सवाईगंधर्व, नाट्यपुष्प आणि अथर्व थिएटर या तीन महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती असलेलं हे नाटक मुंबईतील एका आलिशान उंच इमारतीत घडतं आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. आकाश भडसावळे, स्फूर्ती श्रीकांत तटकरे आणि समिता भरत काणेकर यांची निर्मिती असणारी ही सस्पेन्स थ्रिलर गोष्ट लवकरच रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. चाहते या नाटकासाठी खूपच उत्सुक आहेत.

दोन यशस्वी लेखकांची दीर्घकाळाची मैत्री, त्यातून उभी राहिलेली व्यावसायिक भागीदारी आणि पुढे हळूहळू उलगडत जाणारी एकमेकांची रहस्यं, कारस्थानं, या सगळ्यातून सूडाचा एक धोकादायक खेळ रंगतो. जो या नाटकात पाहायला मिळणार आहे. मित्रप्रेम, लोभ आणि धावपळीच्या युगात सहजपणे होणारा विश्वासघात यावर हे नाटक प्रकाश टाकते. नाटक पाहताना प्रत्येकक्षणी पुढे काय, घडेल हे पाहण्याची उत्कंठा लागून राहते.

'२३ वा मजला' या नाटकात तरुण लेखकाची भूमिका मराठमोळा अभिनेता शशांक केतकर साकारणार आहे. तसेच या नाटकात अनिकेत विश्वासराव एका अत्यंत वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. त्याच्या पात्राचे नाव अमित यादव असे आहे. अनिकेत यांनी साकारलेला अमित यादव हा एक तरुण, हुशार, क्रिएटिव्ह आणि पुरस्कारप्राप्त लेखक आहे.

शिरीष देखणे यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाटकात शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव, मयुरी वाघ, सुजित देशपांडे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य, अजित परब यांचं संगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना या नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT