Mulshi Pattern 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mulshi Pattern 2: प्रविण तरडेंच्या 'मुळशी पॅटर्न 2'ला मुळशीकरांचा विरोध; तालुक्याची बदनामी होत असल्याचा आरोप

Mulshi Pattern 2: मुळशी पॅटर्न 2 या चित्रपटाच्या नावाला मुळशीकरांनी विरोध केला आहे. चित्रपटामुळे तालुक्याची गुन्हेगारी प्रतिमा निर्माण होत असल्याचा आरोप करत नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Mulshi Pattern 2: मराठीतील हरहुन्नरी दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न 2’ या आगामी चित्रपटाच्या नावाला मुळशी तालुक्यातील नागरिकांनी विरोध केला आहे. चित्रपटाच्या नावामुळे संपूर्ण तालुक्याची बदनामी होत असून, मुळशीची ओळख गुन्हेगारी तालुका अशी निर्माण होत असल्याचे मुळशीकरांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पौड गावात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुळशी तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ठराव घेऊन चित्रपटाच्या नावाला विरोध करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

मुळशी पॅटर्न’ या पहिल्या चित्रपटामुळे मुळशी तालुका देशभर चर्चेत आला. मात्र, या चित्रपटामुळे तालुक्याची ओळख गुन्हेगारीशी जोडली गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. आता ‘मुळशी पॅटर्न 2’ हे नाव वापरल्यामुळे हीच प्रतिमा आणखी दृढ होण्याची शक्यता असल्याने मुळशीकरांनी हा आक्षेप घेतला आहे.

मुळशी तालुक्यात उद्योग, व्यवसाय तसेच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत असताना तालुक्याची ओळख केवळ गुन्हेगारीशी जोडली जाणे योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चित्रपटाच्या नावामुळे स्थानिक युवकांच्या नोकरीच्या संधी, उद्योग-व्यवसाय आणि विवाहावरही परिणाम होत असल्याचा दावा मुळशीकरांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याकडे ‘मुळशी पॅटर्न 2’ या चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्र चित्रपट महामंडळाकडेही याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मुळशीकरांच्या मते, चित्रपटाला विरोध करण्यामागे चित्रपटाच्या आशयाला विरोध नसून तालुक्याची चुकीची आणि एकांगी प्रतिमा निर्माण होऊ नये, हा मुख्य उद्देश आहे. मुळशीची ओळख उद्योग, निसर्ग, शिक्षण आणि विकासासाठी व्हावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT