मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding Invite : अमृता खानविलकरसह आणखी एका मराठी कलाकाराला अंबानींच्या लग्नाची पत्रिका! नेमका तो कलाकार कोण?

Amruta Khanvilkar And Shreyas Raje : हॉलिवूडसह बॉलिवूड सेलिब्रिटी तर लग्नाला उपस्थित राहणारच आहेत, पण त्यासोबतच मराठी सेलिब्रिटीही लग्नाला उपस्थिती लावणार आहेत.

Chetan Bodke

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. येत्या १२ जुलै रोजी मुंबईच्या बीकेसीमधील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये सप्तपदी घेणार आहेत. अनेक सेलिब्रिटी यावेळी लग्नासाठी उपस्थिती लावणार आहेत. हॉलिवूडसह बॉलिवूड सेलिब्रिटी तर लग्नाला उपस्थित राहणारच आहेत, पण त्यासोबतच मराठी सेलिब्रिटीही लग्नाला उपस्थिती लावणार आहेत. कोणकोणते मराठी सेलिब्रिटी लग्नाला उपस्थिती दर्शवणार आहेत. याची यादी समोर आली आहे.

मराठमोळा अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता श्रेयस राजे ह्यालाही अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत चाहत्यांनाही बातमी दिली आहे.

शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये, अभिनेता श्रेयस राजे म्हणतो, "तर, ही दस्तूरखुद्द मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचावी, यासाठी अंबानी मॅनेजमेंटकडून एक अख्खा माणूस अपॉईटमेंट केला होता. जो बांद्राहून घोडबंदरपर्यंत फक्त ही पत्रिका द्यायला आला होता. #CrazyManagement " अशी स्टोरी अभिनेत्याने शेअर केली आहे.

पुढे आणखी एक फोटो शेअर करत, "आता जावं लागेल लग्नाला !" असे कॅप्शन दिले आहे.

Shreyas Raje Insta Post
Shreyas Raje Insta Post

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी आतापर्यंत फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींनाच आमंत्रण मिळालं होतं. पण आता मराठी इंडस्ट्रितल्या सेलिब्रिटींनाही आमंत्रण मिळाल्यामुळे, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी शुभ मुहूर्तावर ठीक दुपारी ३ वाजता मुंबईमध्ये पार पडणार आहे. तर, १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ पार पडेल. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

तर, १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या रिसेप्शन सोहळ्याला फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, बिझनेसमन आणि प्रमुख राजकीय मंडळींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT