Anant Emotional Speech Google
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Pre-wedding : मुलाचं भावनिक भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; Watch Video

Anant Emotional Speech : सध्या सोशल मीडियावर अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. आता नुकताच आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. यात अनंत भाषण करताना दिसत आहे.

Bharat Jadhav

Anant-Radhika Pre-wedding Mukesh Ambani Got Emotional:

गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगचा सोहळा होत आहे. सोहळा १ मार्चपासून सुरू झालाय. या जोडप्याच्या प्री-वेडिंग पार्टीला देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचे इनसाइड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमाचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी भाषण करताना दिसत आहेत. अनंतचे भाषण ऐकून त्यांचे वडील मुकेश अंबानी भावूक झाले दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Latest News)

माझं आयुष्य नेहमी इतकं चांगलं राहिलं नाहीये. लहानपणापासून मला अनेक आजारांना तोंड द्यावे लागलंय. परंतु माझ्या आई-वडिलांनी मला नेहमी हिम्मत दिली. त्यांनी मला कधीच मी आजारी असल्याचं भासू दिलं नाही. मी चांगला होईन असा विश्वास त्यांनी दिला आणि मला जे हवं ते एकदिवशी नक्कीच करेल. त्यानंतर पुढे बोलताना अनंतने त्यांच्या आई-वडिलांचे आभार मानले. अनंतचं भाषण ऐकून मुकेश अंबानी हे भावूक झाले होते. आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून मुकेश अंबानी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

अंबानी किती भावूक झाले होते हे आपण व्हिडिओत पाहू शकतो. गुजरातमधील जामनगरमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने आदल्या दिवशी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली, तर आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात हर्षदीप कौरच्या लाईव्ह परफॉर्मन्सने झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. टायगर श्रॉफ, कतरिना कैफ, विकी कौशलही या कार्यक्रमासाठी जामनगरला पोहोचलेत. अनेक सेलिब्रिटी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात सहभागी झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nightmares in AC Room: खरंच एसी लावून झोपल्यास भयानक स्वप्न पडतात? डॉक्टरांनी सांगितलं वैज्ञानिक कारण

Dance Video Viral: गणपतीचा उत्साह! 'अशी चिक मोत्यांची माळ' गाण्यावर आजींनी केलाय डान्स, Video व्हायरल

Railway Rule: आता रेल्वेतून फक्त ३५ किलोच सामान नेता येणार; विमानासारखा नियम होणार लागू

Shivneri Fort History: जुन्नरच्या डोंगररांगेतील शिवनेरी किल्ला, जाणून घ्या इतिहास आणि अनोखी वैशिष्ट्ये

Manoj Jarange: अजूनही संधी आहे, त्याचं सोनं करा नाहीतर...; मुंबईत येण्यापूर्वी मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT