Neeta And Mukesh Ambani Dance With Grandchildren Instagram
मनोरंजन बातम्या

Neeta And Mukesh Ambani Dance : अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यात मुकेश- नीता अंबानी यांचा रोमँटिक डान्स; सलमान-रणबीरही पडले फिके, पाहा VIDEO

Neeta And Mukesh Ambani Dance With Grandchildren : संगीत सोहळ्यामध्ये, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आकाश- श्लोकाची मुलं पृथ्वी आणि वेदा आणि ईशा- आनंद यांची मुलं आद्या आणि क्रिष्णा यांच्यासोबत डान्स केला आहे.

Chetan Bodke

अनंत- राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झालेली आहे. अनंत-राधिका यांचा संगीत सोहळा मुंबईतील बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी हॉलिवूडसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याशिवाय काही क्रिकेटर्सलाही संगीत सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.

सध्या या इव्हेंटमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संगीत सोहळ्यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला तो अंबानी कुटुंबीयांचा डान्स. त्यासोबतच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचाही एक डान्स परफॉर्मन्स. सध्या सोशल मीडियावर मुकेश आणि नीता यांचा रेट्रो डान्स तुफान व्हायरल होत आहे.

विरल भयानी या पापाराझी इन्स्टा चॅनलवर मुकेश आणि नीता यांचा रेट्रो डान्स शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबत आकाश- श्लोकाची मुलं पृथ्वी आणि वेदा, ईशा- आनंद यांची मुलं आद्या व क्रिष्णा सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे सर्वजण एका कारमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. या सर्वांनी १९६८ मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्रम्हचारी’ चित्रपटातल्या ‘चक्के में चक्का, चक्के पे गाडी’ गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. ५६ वर्षे जुन्या गाण्यावर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अंबानी कुटुंबीयांचं कौतुक केलं आहे. अनेकदा त्यांचं चाहते कौतुक करतात. याशिवाय अंबानी कुटुंबीयांनी ‘ओम शांती ओम’ या गाण्यावरही डान्स केलेला आहे. राधिका- अनंत यांच्या संगीत सोहळ्यातील अनेक व्हिडीओंची सोशल मीडियावर चर्चा आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत- राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटीसोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. या भव्य लग्नाचे कार्ड आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. १२ जुलैला भव्य दिव्य लग्न, १३ जुलैला शुभ आशीर्वाद सोहळा तर १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिर्डीत दाखल

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT