Mugdha vaishampayan and Prathamesh laghate Saam tv
मनोरंजन बातम्या

Mugdha Vaishampayan & Prathamesh Laghate: आमचं ठरलंय! मुग्धा-प्रथमेशचे सूर जुळले; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली प्रेमाची कबुली

Sa Re Ga Ma Pa L'il Champs Fame Prathamesh Laghate: गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमळ नात्याची कबुली दिली आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: सारेगम लिटल चॅम्पचं पहिलं पर्व खूपच गाजलं. या पर्वातील स्पर्धक या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. या कार्यक्रमातील स्पर्धक आर्या आंबेकर,रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड या गायकांनी खूपच उंच भरारी घेतली आहे. यातील दोन स्पर्धक आणि आताचा प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमळ नात्याची कबुली दिली आहे. त्यांच्या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Latest Marathi News)

सारेगम लिटल चॅम्पचं पहिलं पर्व गाजवणारे मुग्धा-प्रथमेशने सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. प्रथमेशनने त्याच्या इन्स्टाग्राम अंकाऊटवरून ही प्रेमाची कबुली दिली आहे. प्रथमेशने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आणि मुग्धा रोमँटिक पोझमध्ये उभे आहे. तसेच त्याने या फोटोला आमचं ठरलंय, असं कॅप्शन दिलं आहे.

गायक प्रथमेशने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सारेगम लिटल चॅम्पमधील कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत यांचं लग्न झालं आहे. तर आर्या आंबेकर सध्या करिअर फोकस करताना दिसत आहे. अशातच आता प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनी प्रेमाची कबुली दिली आहे.

प्रथमेश लघाटेच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. त्याच्या पोस्टमधील फोटोवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या या रोमँटिक फोटोवरूनही चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघांच्या प्रेमाच्या कबुलीनंतर आता दोघे लग्नबंधनात केव्हा अडकणार, यावरूनही चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच टाकली रेड, आरोपी फरार

Bigg Boss 19 : तान्या मित्तलवर सलमान भडकला; अशनूरच्या डोळ्यात आले पाणी, 'वीकेंड का वार'मध्ये नेमकं घडलं काय?

Maharashtra Live News Update : जुन्या मुंबई पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

'सुनेच्या पगारातून सासऱ्याला २० हजार रूपये मिळतील'; उच्च न्यायालयाचा निकाल, नेमकं प्रकरण काय?

Cochin Shipyard Bharti: १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! कोचीन शिपयार्डमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT