Atharva The Origin  SaamTvNews
मनोरंजन बातम्या

Atharva : धोनीची पहिली ग्राफिक कादंबरी 'अथर्व: द ओरिजिन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार एमएस धोनी आपली नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने आज त्याच्या 'अथर्व: द ओरिजिन' या ग्राफिक कादंबरीचा फर्स्ट लुक रिलीज केला.

वृत्तसंस्था

Atharva The Origin : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आपली नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने आज त्याच्या 'अथर्व: द ओरिजिन' (Atharva: The Origin) या ग्राफिक कादंबरीचा फर्स्ट लुक रिलीज केला. धोनीने फेसबुकच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्याने एक मोशन क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये धोनी सुपरहिरोच्या भूमिकेत दिसत आहे. यामधील धोनीचा अवतार चाहत्यांना खूप आवडला असून चाहते आपल्या आवडत्या माहीचे कौतुक करत आहेत.

धोनीने शेअर केलेल्या फर्स्ट लूक क्लिपमध्ये धोनी युद्धभूमीवर अॅनिमेटेड अवतारात दिसत आहे. या क्लिपमध्ये धोनीचे अॅनिमेटेड पात्र राक्षसासारख्या सैन्याविरुद्ध लढताना दिसत आहे. धोनीची ही ग्राफिक कादंबरी लेखक रमेश थमिलमणी यांनी लिहिली आहे. धोनीचा हा नवा अवतार पाहून चाहत्यांना नक्कीच आनंद होईल आणि आता ते या ग्राफिक नॉव्हेलच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असतील.

एमएस धोनी त्याच्या नवीन ग्राफिक्स कादंबरीत अथर्वच्या (Atharva) भूमिकेत दिसणार आहे, धोनीने स्वतः त्याच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करून घोषणा केली आहे की तो 'अथर्व द ओरिजिन' या ग्राफिक कादंबरीत दिसणार आहे. 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी नवीन मार्ग शोधत असल्याचे दिसते आणि अथर्व त्यापैकी एक आहे.

“नवीन काळातील ग्राफिक कादंबरी” ची घोषणा 2020 मध्ये “नवीन लेखकाच्या अप्रकाशित पुस्तकाचे रूपांतर” म्हणून करण्यात आली. धोनीची पत्नी साक्षी सिंह धोनी, जी धोनी एंटरटेनमेंटची व्यवस्थापकीय संचालक आहे, तिने या मालिकेच्या निर्मितीबद्दल सांगितले. तिने याला “थ्रिलिंग सिरीज” म्हटले आहे. मात्र, धोनीच्या या नव्या इनिंगमुळे या ग्राफिक कादंबरीबद्दल त्याच्या चाहत्यांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहचली असून अथर्वच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT