MS Dhoni Upcoming Movie Trailer Out Saam TV
मनोरंजन बातम्या

LGM Trailer Launched : एमएस धोनीची पत्नी साक्षीसह नवी इनिंग ; 'लेट्स गेट मॅरिड'चा ट्रेलर प्रदर्शित

LGM Trailer Out : धोनी आणि साक्षी चित्रपटाच्या ऑडिओ आणि ट्रेलर लॉन्च करण्यासाठी चेन्नईत गेले होते.

Pooja Dange

MS Dhoni’s Debut Production LGM Trailer : महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. काही महिन्यांपूर्वी 'LGM' (लेट्स गेट मॅरीड) या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची त्यांनी घोषणा केली होती. या फॅमिली एंटरटेनर चित्रपटामध्ये हरीश कल्याण, इवाना आणि नादिया मुख्य भूमिकेत आहेत.

10 जुलै रोजी धोनी आणि साक्षी चित्रपटाच्या ऑडिओ आणि ट्रेलर लॉन्च करण्यासाठी चेन्नईत गेले होते. आधुनिक काळातील प्रेम, सासू आणि सून यांच्यातील नात्यावर हा चित्रपट आधारित असल्याचे चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुमच्या लक्षात येईल.

'LGM', या महिन्याच्या शेवटी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 10 जुलै रोजी चेन्नईच्या लीला पॅलेसमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमात 'LGM'चा ट्रेलर आणि ऑडिओ लॉन्च करण्यात आला.

ट्रेलरमध्ये हरीश कल्याण आणि इवाना हे तरुण जोडपे दाखवले आहेत, ज्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु इवानाच्या या चित्रपटातील पात्राला तिच्या होणाऱ्या नवऱ्या आईसोबत एकाच छताखाली राहण्याआधी खात्री हवी आहे.

त्यामुळे तिने तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या पालकांसोबत सहलीला प्लॅन केला आहे, ज्यामुळे त्यांना एकमेकांना जाणून घेण्यास मदत होईल. तर चित्रपटामध्ये ट्विस्ट येतो, तिचे आणि सासूचे अपहरण करून जंगलात नेले जाते. त्या दोघेही ही समस्या कशी हाताळतात यावर हा चित्रपट आहे.

'लेट्स गेट मॅरीड' किंवा 'एलजीएम' हा चित्रपट म्हणजे निव्वळ कौटुंबिक मनोरंजन आहे. इव्हेंटमध्ये, एमएस धोनी आणि साक्षी यांनी खुलासा केला की त्यांनी चेन्नईवर असलेल्या प्रेमामुळे इथे चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटात हरीश कल्याण, इवाना आणि नादिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच रमेश थमिलमनी यांनी चित्रपटाला संगीतही दिले आहे.

योगी बाबू, मिर्ची विजय आणि व्हीटीव्ही गणेश सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 'LGM' या महिन्यात प्रदर्शित होणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT