Mrunmayee Deshpande Wedding Anniversary Instagram @mrunmayeedeshpande
मनोरंजन बातम्या

Mrunmayee Deshpande: मृण्मयी देशपांडेने नवऱ्याला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट करत म्हणाली 'अजून काय मागू…'

मृण्मयीने तिच्या नवऱ्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Pooja Dange

Mrunmayee Deshpande Instagram Post: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मृण्मयी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या आयुष्यातील अनेक घटना ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर करत असते. नुकतीच मृण्मयीने तिच्या नवऱ्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याचे कारणही तसेच खास आहे.

मृण्मयी देशपांडेने 'आज सहा वर्ष झाली... आय लव्ह यु राव... तू आपले स्वप्न साकारत आहेस, अजून काय मागू' असे कॅप्शन देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच तिने तिच्या नवऱ्यासोबतच फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून मृण्मयीने तिच्या नवऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या लग्नाला सहा पूर्ण झाली असल्याचेही तिने यावेळी सांगितले आहे. मृण्मयी आणि तिचा नवऱ्याने या फोटोमध्ये डोक्यावर हॅट घातली आहे. तसेच मृण्मयीने हॅटवर गॉगल लावला आहे. या फोटोमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. (Social Media)

मृण्मयी देशपांडेच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह तिचे सहकलाकार देखील कमेंट करत आहेत. अभिजीत खांडकेकर आणि अमृता खानविलकर यांनी दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसचे मृण्मयीचे चाहते सुद्धा कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.

मृण्मयी देशपांडे आणि स्वप्निल राव हे २०१६मध्ये विवाहबद्ध झाले. सध्या दोघे मिळून त्यांचे स्वप्न साकारत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात एक घर असावा असं स्वप्न त्यांनी पाहिलं होत. दोघेही मिळून त्यांचे हे स्वप्न पूर्ण करत आहेत. त्यांनी त्यांच्या नव्या घराचं बांधकाम सुरू केलं आहे. त्याच्याच संदर्भ मृण्मयीने तिच्या कॅप्शनमध्ये दिला आहे. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT