Mrunal And Dhanush Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष व्हॅलेंटाईन डेला अडकणार लग्नबंधनात? वाचा महत्वाची अपडेट

Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या बऱ्याच काळापासून व्हायरल होत होत्या. अलिकडेच असे वृत्त आले की ते दोघे लग्न करणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Mrunal And Dhanush: शुक्रवारी, मृणाल ठाकूर आणि धनुष यांच्याबद्दल एक बातमी व्हायरल झाली त्यामुळे चाहते आणि नेटकरी थक्क झाले. अशी अफवा होती की ते दोघे फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहेत. पण आता सत्य समोर आले आहे. फेब्रुवारीमध्ये या कपलचं लग्न होणार की नाही याची अपडेट मिळाली आहे.

चित्रपट प्रदर्शित होणार

रिपोर्टनुसार मृणालचा सिद्धांत चतुर्वेदी अभिनीत 'दो दिवाने शहर में' हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे, मग लग्न कसे होऊ शकते? शिवाय, तिचा तेलुगू चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये या दोघांचं लग्न नाही तर मृणालचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

डेटिंगच्या अफवा कधीपासून पसरत आहेत?

मृणाल आणि धनुष डेटिंग करत असल्याच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत आहेत. विशेषतः धनुष मृणालच्या 'सन ऑफ सरदार २' चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी मुंबईत आल्यापासून या अफवा वाढल्या आहेत. धनुषने याबद्दल कहीही बोलला नाही, परंतु मृणालने तो फक्त एक मित्र असल्याचे सांगितले होते.

एका मुलाखतीदरम्यान मृणाल म्हणाली की धनुष फक्त एक चांगला मित्र आहे. स्क्रीनिंगला उपस्थित राहण्याबाबत मृणाल म्हणाली की त्याला अजय देवगणने आमंत्रित केले होते. या तिच्या मुलाखतीनंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवांना देखील पूर्णविराम लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News : ४४० किलो गांजा, किंमत दीड कोटी; ड्रग्ज माफियांचा पोलिसांनी केला पर्दाफाश, २४ वर्षांच्या तरुणाला बेड्या

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवाजीनगरमध्ये उद्या पाणी बंद

Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते, VIP जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड

Heart Shape Mangalsutra : नवरा- बायकोच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या हार्ट शेप मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न

Fast lifestyle: तुम्हीही सतत घाईत असता? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांच इशारा

SCROLL FOR NEXT